
नवी दिल्ली : दिल्लीच्या विरोधी पक्ष नेत्या आतिशी यांच्यासह आम आदमी पक्षाच्या (आप) १२ आमदारांना विधानसभेच्या अधिवेशनातून दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. आज मांडल्या जाणाऱ्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) च्या अहवालावर झालेल्या गोंधळानंतर ही कारवाई करण्यात आली.
दिल्ली विधानसभेत लेफ्टनंट गव्हर्नर व्ही. के. सक्सेना यांच्या अभिभाषणादरम्यान आम आदमी पक्षाच्या आमदारांनी गदारोळ घातला. भाषण सुरू होताच आम आदमी पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या कार्यालयातून भीमराव आंबेडकरांचा फोटो हटवल्याचा निषेध करण्यास सुरुवात केली. यावर विधानसभा अध्यक्षांनी आम आदमी पक्षाच्या सर्व आमदारांना दिवसभरासाठी निलंबित केले.

मुंबई: पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी सकाळीच भूकंपाचे धक्के जाणवले. बंगालच्या खाडीमध्ये आलेल्या या भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल इतकी होती. नॅशनल ...
दिल्ली विधानसभेतून निलंबित करण्यात आलेल्या विरोधी पक्षनेत्या आतिशीसह आपच्या आमदारांनी विधानसभेच्या आवारात निदर्शने केली.निलंबनाच्या् कारवाईवर बोलताना आतिशी म्हणाल्या की, "भाजपने मुख्यमंत्री कार्यालय, कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकरांचे चित्र बदलून पंतप्रधान मोदींचे चित्र लावले आहे. आंबेडकरांचे चित्र त्या जागी लावले जात नाही तोपर्यंत आम्ही त्याचा निषेध करत राहू असे आतिशी यांनी सांगितले.