Airtelच्या ग्राहकांसाठी खुशखबर! ‘या’ रिचार्जमुळे मिळणार ‘ॲपल’ची सेवा

  74

मुंबई : जिओ (Jio), एअरटेल (Airtel), व्हीआय (VI), बीएसएनएल (BSNL) या सर्व कंपन्या त्यांच्या ग्राहकांसाठी सातत्याने नवनवीन रिचार्ज प्लॅन लाँच करत असतात. अशातच एअरटेल कंपनी आता ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. अ‍ॅपल टीव्ही प्‍लस आणि अ‍ॅपल म्युजिक (Apple TV+ and Apple Music) चा लाभ ग्राहकांना घेता यावा यासाठी भारती एअरटेल आणि ॲपल यांनी पार्टनरशिप केली आहे. यामुळे आता एअरटेलच्या (Airtel Offer) ग्राहकांना थेट ॲपल’ची सेवा मिळणार आहे.



एअरटेलने वाय-फाय प्लॅन, एअरटेलचा प्रीपेड किंवा पोस्टपेड प्लॅन आदी अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध केले आहेत. त्यानंतर आता सर्व एअरटेल वायफाय ग्राहकांना ९९९ रुपयांपासून सुरू होणाऱ्या होम वाय-फाय प्लॅन्सवर अ‍ॅपल टीव्ही प्‍लसच्या कंटेंटमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहेे. त्याचबरोबर प्रवास करताना एकाधिक डिव्हाइसेसवर तुम्ही हा कन्टेन्ट पाहू शकणार आहत. याव्यतिरिक्त, पोस्टपेड ग्राहक ९९९ रुपये पासून सुरू होणाऱ्या प्लॅनवर अ‍ॅपल टीव्ही प्‍लस आणि अ‍ॅपल म्युजिकमध्ये सहा महिन्यांसाठी प्रवेश मिळेल.


एअरटेलच्या (Airtel) ॲपल बरोबरच्या या पार्टनरशिपमुळे ग्राहकांना खास प्रीमियम, नाटक (ड्रामा) आणि विनोदी मालिका (कॉमेडी सीरिज), कथाचित्रपट (फीचर फिल्म्स), अभूतपूर्व माहितीपट (डॉक्युमेंटरी) आणि मुलांचे व कौटुंबिक मनोरंजनसुद्धा होईल. याव्यशिवाय, ॲपल म्युझिकची इंग्रजी, हिंदी आणि इतर अनेक भाषांमध्ये अनमॅच लायब्ररी एक अद्वितीय ऑडिओ अनुभव देईल.



काय आहेत होम वाय-फाय प्लॅन्स?



  • ९९९ रुपये होम वाय-फाय प्लॅनमध्ये ग्राहकांना २०० Mbps स्पीडसह ॲपल टीव्ही प्लस, झी ५, ॲमेझॉन प्राईम, जिओ हॉटस्टार, २३ प्लस ओटीटी आणि बरंच काही ओटीटी बेनेफिट्स मिळणार आहेत.

  • १०९९ रुपये होम वाय-फाय प्लॅनमध्ये ग्राहकांना २०० Mbps स्पीडसह ३५० प्लस चॅनेल्स (एचडी) टीव्ही बेनेफिट्स तसेच ॲपल टीव्ही प्लस, झी ५, ॲमेझॉन प्राईम, जिओ हॉटस्टार, २३ प्लस ओटीटी आणि बरंच काही ओटीटी बेनेफिट्स मिळणार आहेत.

  • १५९९ रुपये होम वाय-फाय प्लॅनमध्ये ग्राहकांना ३०० Mbps स्पीडसह ३५० प्लस चॅनेल्स (एचडी) टीव्ही बेनेफिट्स तसेच ॲपल टीव्ही प्लस, झी ५, ॲमेझॉन प्राईम, जिओ हॉटस्टार, २३ प्लस ओटीटी आणि बरंच काही ओटीटी बेनेफिट्स मिळणार आहेत.

  • ३९९९ रुपये होम वाय-फाय प्लॅनमध्ये ग्राहकांना १ Gbps स्पीडसह ३५० प्लस चॅनेल्स (एचडी) टीव्ही बेनेफिट्स तसेच ॲपल टीव्ही प्लस, झी ५, ॲमेझॉन प्राईम, जिओ हॉटस्टार, २३ प्लस ओटीटी आणि बरंच काही ओटीटी बेनेफिट्स मिळणार आहेत.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या