मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत झाली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र विधीमंडळाच्या सन २०२४-२५ या कार्यकाळासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजप विधीमंडळ मुख्य प्रतोद रणधीर सावरकर यांच्या संमतीने या समित्यांची नियुक्ती करण्यात आली. अशातच भाजपाच्या नेतृत्वाखाली नवे नियुक्त सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.
सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी पुणे जिल्ह्यातील दौंड मतदारसंघातील भाजपचे नेते राहुल कुल यांची वर्णी लागली. तर पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे-पाटील यांची वर्णी लागली. तर आश्वासन समितीच्या अध्यक्ष पदावर रवी राणा यांची, तर अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी नारायण कुचे यांची नियुक्ती करण्यात आली. अनुसूचित जमाती कल्याण समितीवर राजेश पाडवी, तर महिला हक्क व कल्याण समितीवर मोनिका राजळे या अध्यक्ष राहणार आहे.
इतर मागासवर्गीय कल्याण समितीवर किसन कथोरे, मराठी भाषा समिती पदावर अतुल भातखळकर, विशेष हक्क समितीवर राम कदम, धर्मादाय खाजगी रुग्णालय तपास समितीवर श्रीमती नमिता मुंदडा, आणि आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्ष पदावर सचिन कल्याणशेट्टी हे अध्यक्ष म्हणून कारभार पाहणार आहे. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेसकडून अद्यापही विधिमंडळ समितींबाबत घोषणा झालेली नाहीय. तर दोन्ही पक्षांकडून समितींबाबत घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधीमंडळाच्या एकूण 29 समित्या असतात, त्यातील महायुतीच्या फाॅर्म्युल्यानुसार भाजपच्या वाटेला ११ समित्या आल्याची सूत्रांची माहिती आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…