Thursday, June 19, 2025

मुख्य आर्थिक सल्लागार नागेश्वरन यांना २ वर्षे मुदतवाढ

मुख्य आर्थिक सल्लागार नागेश्वरन यांना २ वर्षे मुदतवाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): केंद्र सरकारने देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांचा कार्यकाळ मार्च २०२७ पर्यंत दोन वर्षांसाठी वाढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने नागेश्वरन यांचा कार्यकाळ ३१ मार्च २०२७ पर्यंत वाढवला आहे.

नागेश्वरन यांची २८ जानेवारी २०२२ रोजी देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. २०२२-२३चा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना त्यांच्या नियुक्तीची घोषणा झाली होती. केंद्र सरकारला आर्थिक धोरणांवर सल्ला देणे यासह केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी संसदेत सादर केला जाणारा आर्थिक पाहणी अहवाल तयार करण्याचे काम हे मुख्य आर्थिक सल्लागारांचे कार्यालय करत असते. माजी मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमणियन यांच्यानंतर मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नागेश्वरन यांची निवड करण्यात आली होती.
Comments
Add Comment