Friday, May 9, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Fight Against Obesity : पंतप्रधान मोदींची लठ्ठपणाविरोधात मोहीम, १० सेलिब्रेटींना केले आवाहन

Fight Against Obesity : पंतप्रधान मोदींची लठ्ठपणाविरोधात मोहीम, १० सेलिब्रेटींना केले आवाहन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लठ्ठपणाच्या विरोधात राष्ट्रव्यापी मोहीम सुरू केली आहे. नागरिकांनी वजन नियंत्रणात राखण्यासाठी पदार्थांमधील तेलाचा वापर मर्यादीत करावा. सध्या वापरता त्यापेक्षा १० टक्के कमी तेल वापरा. गरजेपुरतेच तेल पदार्थांसाठी वापरा. अती तेलकट खाणे टाळा आणि निरोगी राहा; असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जात प्रगती साधण्यासाठी आधी निरोगी राहणे आवश्यक आहे. निरोगी व्यक्ती प्रभावीरित्या प्रगतीच्या दिशेने प्रवास करू शकते तसेच या प्रगतीचे लाभ घेऊ शकते. या विचारातून पंतप्रधान मोदींनी लठ्ठपणाच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे.






लठ्ठपणाच्या विरोधात जनजागृती मोहीम सुरू करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्टद्वारे देशातील १० सेलिब्रेटींना टॅग करुन मोहिमेत सहभागी होण्याचे आणि जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्या १० जणांना त्यांच्या ओळखीतील प्रत्येकी १० जणांना टॅग करुन मोहिमेचा विस्तार करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदींनी टॅग केलेल्यांमध्ये जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि महिंद्रा समुहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांचा समावेश आहे.





पंतप्रधान मोदींनी कोणाला टॅग केले आहे ?




  1. महिंद्रा समुहाचे चेअरमन आनंद महिंद्रा

  2. गायक - अभिनेते निरहुआ हिंदुस्तानी

  3. ऑलिम्पिक पदकविजेती नेमबाज मनू भाकर

  4. खेळाडू मीराबाई चानू

  5. अभिनेता मोहनलाल

  6. इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलकेणी

  7. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला

  8. अभिनेता आर. माधवन

  9. गायिका श्रेया घोषाल

  10. पद्मभूषण पुरस्काराने गौरविलेल्या राज्यसभेतील खासदार सुधा मूर्ती


Comments
Add Comment