Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजछत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड-किल्ल्यांना नामांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड-किल्ल्यांना नामांकन

पॅरिस : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड-किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा यासाठी सांस्कृतिक विभाग मंत्री आशिष शेलार यांनी शिष्टमंडळासह युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांची भेट घेतली. ‘महाराष्ट्र आणि मुंबईचे सुपुत्र असलेल्या विशाल यांच्यासह, केंद्र सरकारच्या प्रयत्नाने आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने आपल्या शिवछत्रपतींच्या १२ गड किल्ल्यांचे जागतिक वारसामध्ये नामांकन झाले आहे,’ अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे.

आंगणेवाडी जत्रोत्सवाची उत्साहात सांगता !

अंतिम निर्णय व्हायचा आहे. त्याबद्दलचे सादरीकरण व यासंबंधित पुढील टप्प्यातील तयारीसाठी शिष्टमंडळासह येऊन चर्चा केल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. यावेळी शिष्टमंडळ सदस्य म्हणून अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उप संचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद शिखा जैन उपस्थित होत्या.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटीबद्ध व्हावे – एकनाथ शिंदे

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला, स्वराज्याची पहिली राजधानी असलेला राजगड, स्वराज्याच्या विस्तारानंतर राजधानी केलेला रायगड, यांच्यासह एकूण १२ किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ (Maratha Military Landscape of India) या संकल्पनेच्याआधारे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनुसार शिष्टमंडळाने हा प्रस्ताव सादर केला.

एकूण १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर

रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -