मुंबई: बदाम आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. यात प्रोटीन, फायबर, व्हिटामिन्स, मिनरल्स तसेच ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. ही
हे होतात फायदे
शरीरासाठी गरजेची पोषकतत्वे आहेत. यामुळे दररोज सकाळी आपल्याला बदाम खाल्ले पाहिजेत. रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने अनेक समस्यांचा बचाव होतो.
बदाम खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल याला लो डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणतात त्याचा स्तर कमी होण्यास मदत होते. तसेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. बदामामध्ये सूजविरोधी गुण असल्याने तुम्हाला हृदयरोगापासून बचाव होण्यास मदत होते.
वजन नियंत्रणात राहते
बदामामध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असते. मात्र बदामामध्ये वजन वाढण्याची आणि लठ्ठपणाची जोखीम कमी करण्यास मदत होते.
ब्लड शुगर राहते नियंत्रणात
डायबिटीजच्या रुग्णांना आपली साखर नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. बदामाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. यात फायबरही असतात. यामुळे ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत होते.
त्वचेसाठी फायदेशीर
बदामामध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स, फायबर आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतात. त्यामुळे हे खाल्ल्याने स्किन हेल्दी राहण्यास मदत होते.