Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीजर्मनीत ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन आणि ख्रिश्चन सोशल युनियनच्या युतीचा विजय

जर्मनीत ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन आणि ख्रिश्चन सोशल युनियनच्या युतीचा विजय

बर्लिन : जर्मनीत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ख्रिश्चन डेमोक्रॅटिक यूनियन (सीडीयू) आणि ख्रिश्चन सोशल युनियनच्या (सीएसयू) युतीचा विजय झाला. त्यांना २८.६ टक्के मताधिक्य मिळाले. अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी (एएफडी) या पक्षाला २०.४ टक्के मताधिक्य मिळाले. यामुळे अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी (एएफडी) हा आता जर्मनीतला मुख्य विरोधी पक्ष झाला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड-किल्ल्यांना नामांकन

सीडीयू आणि सीएसयू हे परंपरागत अर्थात रुढीवादी विचारांचे पक्ष म्हणून ओळखले जातात तर एएफडी हा अती उजव्या विचारांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. सीडीयू आणि सीएसयू युतीचे नेते फ्रेडरिक मर्झ हे जर्मनीचे चान्सलर अर्थात जर्मनीचे नेते म्हणून लवकरच शपथ घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर ६९ वर्षांच्या मर्झ यांनी जर्मनीच्या नेतृत्वात युरोपने अमेरिकेपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे जिंकल्यानंतर सांगितले.

शशी थरुर काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वावर नाराज

जर्मनी हा युरोपियन युनियनमधील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचा देश आहे. यामुळे युरोपच्या राजकारणावर जर्मनीच्या निवडणुकीचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. अमेरिकेत ट्रम्प सत्तेत आल्यानंतर बदलत असलेले जागतिक राजकारण, जर्मनीची अर्थव्यवस्था, युरोपियन युनियनची अर्थव्यवस्था, स्थलांतरित अशा अनेक आव्हानांना एकाचवेळी सामोरे जाण्याची तयारी फ्रेडरिक मर्झ यांना आता करावी लागेल.

EU Commission : युरोपियन युनियन कमिशनचे अध्यक्ष आणि युरोपचे वरिष्ठ नेतृत्व २७-२८ फेब्रुवारीला भारत भेटीवर

रशिया – युक्रेन संघर्ष संपवण्यासाठी सौदी अरेबियाच्या मध्यस्थीने अमेरिका आणि रशियाच्या नेत्यांनी चर्चा केली. या चर्चेपासून युक्रेन आणि युरोपियन युनियनला दूर ठेवण्यात आले होते. पण या चर्चेअंती अमेरिकेने युक्रेनला लष्करी मदत थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ट्रम्प प्रशासन युरोपमध्ये काय घडते याकडे दुर्लक्ष करुन फक्त अमेरिकेच्या हितांना प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. बदलेल्या या परिस्थितीत युरोपच्या हितांचे रक्षण करण्यासाठी काय करायचे याचा निर्णय जर्मनीच्या नेतृत्वात आता युरोपियन युनियनला घ्यावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर जर्मनीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात युरोपियन युनियन भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींसोबत युरोपियन युनियन अनेक विषयांवर चर्चा करणार आहे. या चर्चेवर जर्मनीच्या निवडणूक निकालाचे काय पडसाद उमटतात याकडे अनेकांचे लक्ष आहे.

पालघरमधील औषध निर्मात्या कंपनीवर कारवाई, दोन पेनकिलर औषधांवर बंदी

जर्मनीत कशी होते चान्सलरची निवड ?

सार्वत्रिक निवडणुकीद्वारे जर्मनीच्या संसदेसाठी २९९ सदस्यांची थेट निवड होते. यानंतर प्रत्येक पक्ष त्याला मिळालेल्या मताधिक्याच्या आधारे संसदेतील ठराविक जागांसाठी स्वतःच्या निवडक प्रतिनिधींच्या नावांची शिफारस करतो. या पद्धतीने संसदेत ३३१ जणांची नियुक्ती होते. या पद्धतीने जर्मनीच्या संसदेतील ६३० सदस्यांची निवड – नियुक्ती प्रक्रिया पूर्ण होते. यानंतर संसदेत प्रत्येक पक्ष स्वतःच्या चान्सलर पदाच्या उमेदवाराला निवडणुकीसाठी उभा करतो. अनेकदा याच उमेदवाराचा चेहरा पुढे करुन संबंधित पक्ष सार्वत्रिक निवडणूक लढलेला असतो. चान्सलर पदाच्या उमेदवाराला संसदेत बहुमत मिळवावे लागते. यानंतरच त्या उमेदवाराची चान्सलर या पदावर नियुक्ती झाल्याचे जर्मनीचे राष्ट्रपती (प्रेसिडेंट) जाहीर करतात. चान्सलर या पदावर निवड झालेल्या व्यक्तीला राजकीयदृष्ट्या जर्मनीतील सर्वाधिक शक्तिशाली व्यक्ती म्हणून ओळखले जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -