भागलपूर : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या कात्यात जामा झाला आहे. या शेतकऱ्यांना प्रत्येकी २ हजार रुपये मिळाले असून देशातील ९ कोटी ८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून २२ हजार कोटी रुपये वळते झाले आहेत. बिहारच्या भागलपूर येथून पंतप्रधानांनी आज, सोमवारी हा हप्ता जारी केला आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, केंद्र सरकार देशातील गरीब शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत देते. तीन हप्त्यांमध्ये ६ हजार रुपयांची ही आर्थिक मदत दिली जाते. या योजनेला ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात १९ वा हप्ता जमा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. ट्विटरवर दिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले की, पीएम किसान योजनेला ६ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभरातील आपल्या शेतकरी बंधू-भगिनींना खूप खूप शुभेच्छा. आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले आहेत. हे माझ्यासाठी खूप समाधान आणि अभिमानाची गोष्ट आहे. आमचा हा प्रयत्न अन्नदात्यांसाठी आदर, समृद्धी आणि नवीन शक्ती देत आहे.
गेल्या १० वर्षात आमच्या प्रयत्नांमुळे देशातील कृषी क्षेत्राचा वेगाने विकास झाला आहे. आपल्या लाखो लहान शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीमुळे बाजारपेठेतील त्यांची उपलब्धता वाढली आहे. यासोबतच शेतीचा खर्च कमी झाला आहे आणि उत्पन्नही वाढले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले आहे.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…