Virat Kohli: कोहलीने रचला इतिहास, बनला जगातील पहिला खेळाडू

मुंबई: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने एक ऐतिहासिक रेकॉर्ड बनवला आहे. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक रेकॉर्ड मोडला आहे. कोहली आता वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान १४ हजार धावा करणारा खेळाडू बनला आहे.


कोहलीने हे यश २२९ व्या वनडे सामन्यात २८७व्या डावात मिळवले आहे. याआधी हा रेकॉर्ड सचिनच्या नावावर होता. सचिनने ३५०व्या डावात हा रेकॉर्ड केला होता. सचिननंतर श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा नंबर लागतो. त्याने ३७८ डावांत १४ हजार वनडे धावा केल्या आहेत.


कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध २२ धावा केल्या होत्या. तेव्हा या ऐतिहासिक रेकॉर्डपासून १५ धावा दूर होता. मात्र आता पाकिस्तानविरुद्ध दुबईत खेळवण्यात आलेल्या सामन्यात हा इतिहास रचला आहे. कोहलीने १३व्या षटकांतील दुसऱ्या बॉलवर चौकार ठोकत रेकॉर्ड बनला आहे.


भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध या सामन्यात एक धाव करत सचिन तेंडुलकरला मागे टाकले. तो सलामीवीर ९००० धावा करणारा फलंदाज आहे. रोहितने १८१ वनडे डावांत सलामीवीर म्हणून ही कमाल केली.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Ind vs Pak: पाकविरुद्ध अभिषेक शर्मा खेळणार ? सूर्यकुमारने स्पष्टच सांगितलं...

नवी दिल्ली : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामना २९ धावांनी जिंकला. पाठोपाठ

भारताने ओलांडला २०० चा टप्पा, नामिबियाला दिले मोठे आव्हान

नवी दिल्ली : अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरू असलेल्या नामिबिया विरुद्धच्या सामन्यात भारताने २० षटकांत नऊ बाद २०९

वर्ल्डकपमध्ये संजू सॅमसनचे दमदार पदार्पण

नवी दिल्ली : अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरू असलेल्या नामिबिया विरुद्धच्या सामन्यात भारताने दमदार सुरुवात केली

इटलीच्या अष्टपैलू खेळीने नेपाळचा डाव पत्त्यासारखा कोसळला

मुंबई   : टी-२० विश्वचषक २०२६ च्या गट साखळीतील सामन्यात इटलीने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर नेपाळचा १० गडी राखून

टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात संथ अर्धशतक

पल्लेकेले : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या साखळी सामन्यात श्रीलंकेने ओमानचा

ओमानविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा विजय, पवन रथनायके सामनावीर

पल्लेकेले : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या साखळी सामन्यात श्रीलंकेने ओमानचा