दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा अर्धा संघ १६५ धावांत तंबूत परतला आहे. इमाम उल हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार), तय्यब ताहिर हे पाच फलंदाज बाद झाले. पाकिस्तानने ३७ षटकांत पाच बाद १६७ धावा केल्या.
बाबर आझम २३ धावा करुन हार्दिक पांड्याच्या चेंडूवर यष्टीरक्षक केएल राहुलकडे झेल देऊन परतला. इमाम उल हक १० धावा करुन धावचीत झाला. कर्णधार असलेला मोहम्मद रिझवान ४६ धावा करुन अक्षर पटेलच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. सौद शकील ६२ धावा करुन हार्दिक पांड्याच्या चेंडूवर अक्षर पटेलकडे झेल देऊन परतला. तय्यब ताहिर चार धावा करुन रविंद्र जडेजाच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. भारताकडून हार्दिक पांड्याने दोन बळी घेतले. अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी एक बळी घेतला.
IND vs PAK: पाकिस्तानला हरवले तर भारताचे सेमीफायनलचे तिकीट निश्चित!
भारताने बांगलादेश विरुद्धचा सामना सहा गडी राखून जिंकला आहे. तर न्यूझीलंड विरुद्धचा सामना पाकिस्तानने गमावला आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा ६० धावांनी विजय झाला होता. यामुळे अ गटात न्यूझीलंड पहिल्या आणि भारत दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेश तिसऱ्या आणि पाकिस्तान तळाच्या अर्थात चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकल्यास सलग दुसरा विजय मिळवत भारत थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल. यामुळे भारत – पाकिस्तान सामन्यात काय होते याकडे अनेकांचे लक्ष आहे.