

IND vs PAK: पाकिस्तानला हरवले तर भारताचे सेमीफायनलचे तिकीट निश्चित!
मुंबई: भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची सुरूवात चांगली झाली आहे. टीम इंडियालाने पहिल्या सामन्यात बांगलादेशला हरवले. आता भारताचा आज सामना ...
भारताने बांगलादेश विरुद्धचा सामना सहा गडी राखून जिंकला आहे. तर न्यूझीलंड विरुद्धचा सामना पाकिस्तानने गमावला आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा ६० धावांनी विजय झाला होता. यामुळे अ गटात न्यूझीलंड पहिल्या आणि भारत दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेश तिसऱ्या आणि पाकिस्तान तळाच्या अर्थात चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकल्यास सलग दुसरा विजय मिळवत भारत थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल. यामुळे भारत - पाकिस्तान सामन्यात काय होते याकडे अनेकांचे लक्ष आहे.