

Railway News : जलद हार्बर स्वप्नातच राहणार
मुंबई : मुंबई रेल्वे विकास महामंडळाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल अशी जलद हार्बर सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव २०१९ मध्ये सादर केला होता. या ...
'छावा'चित्रपट बघण्यासाठी वैभव टॉकीज येथे धर्मेनसिंग ऊर्फ भगतसिंग सुरजितसिंग भादा (२२) आणि बादशाहसिंग पोलादसिंग भोंड (२३) हे दीघीतील शिव कॉलनीत राहणारे मकोकाचे आरोपी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस मागील काही दिवसांपासून या आरोपींना शोधत होते. अखेर या आरोपींना 'छावा' चित्रपटाच्या निमित्ताने अटक करणे पोलिसांना शक्य झाले.

India vs Pakistan : भारत–पाकिस्तानमध्ये रंगणार महामुकाबला
पाकिस्तानसाठी ‘करो या मरो’ची सामन्यात स्थिती नवी दिल्ली : २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील हाय व्होल्टेज सामना (India vs Pakistan) रविवार, २३ फेब्रुवारी रोजी खेळला ...
दोन्ही आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका), ‘एनडीपीएस’ कायदा आणि शस्त्र कायद्यानुसार दीघी पोली ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने आरोपी चित्रपट बघण्यासाठी आल्याची माहिती मिळताच कोंम्बिग ऑपरेशन केले. पोलिसानी आरोपींना अटक केली. यानंतर आरोपींचा ताबा गुन्हे शाखेने दीघी पोलिसांना दिला. आरोपींची दीघी पोलीस कसून चौकशी करत आहेत. आरोपींनी आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचाही तपास सुरू आहे.