Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांची होळी होणार दणक्यात साजरी! 'या' तारखेला येणार पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांची होळी होणार दणक्यात साजरी! 'या' तारखेला येणार पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता

मुंबई : सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी 'पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना' (PM Kisan Yojana) चालवली जाते. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना दरवर्षी ६हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत देशातील शेतकर्‍यांना पीएम किसान योजनेचे १८ हप्ते मिळाले आहेत. त्यानंतर आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता कधी येणार याची आतुरता लागली होती. तर आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना होळीपूर्वी १९ व्या हप्त्याची रक्कम खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या २४ फेब्रुवारी रोजी बिहारमधील भागलपूर येथून देशभरातील शेतकऱ्यांना १९ वा हप्ता जाहीर करणार आहेत.

Comments
Add Comment