Prahaar Drawing Competition : दैनिक प्रहार चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

  112

शारदाश्रम विद्यामंदिर विद्यार्थ्यांनी विविध कल्पक चित्रे साकारत केले कलागुणांचे प्रदर्शन


मुंबई  : शारदाश्रम विद्यामंदिर मराठी प्राथमिक विभाग या दादरमधील शाळेमध्ये दैनिक प्रहार यांच्या विद्यमाने आयोजित चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध कल्पक चित्रे साकारत आपल्या कलागुणांचे प्रदर्शन घडवले. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक तसेच दैनिक प्रहारच्या प्रतिनिधींची उपस्थिती लाभली. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रहार वृत्तपत्र समूहाचे लेखापाल, प्रशासन अधिकारी, वितरण प्रमुख श्री. ज्ञानेश सावंत, वितरण सह प्रमुख राजेश मर्तल, विभाग प्रतिनिधी अजय कोरे, सुरेश जाधव, रमेश शेट्टी, गणेश कांबळे, हे उपस्थित होते. शाळेच्या वतीने प्रशासकीय व्यवस्थापिका वनजामोहन, मुख्याध्यापिका दिप्ती इंदुलकर, राजेंद्र घाडगे, कांचन खरात, विकास धात्रक, कैलास कांबळे, चित्रकला शिक्षिका पूजा काळे हे उपस्थित होते.



या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या सामाजिक संदेशांचेही कौतुक करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी या उपक्रमाचे महत्त्व सांगत, अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळते असे मत व्यक्त केले. शाळेचे सचिव गजेंद्र शेट्टी सर यांनी अशा प्रकारच्या उपक्रमांना नेहमीच पाठबळ दिले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवर्ग, शाळेचे कर्मचारी आणि पालकांचे विशेष सहकार्य लाभले. भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.



प्रहार चित्रकला स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी


प्रथम क्रमांक (४ पारितोषिके) : त्रिशा अमोल लोरेकर, हंसिका रोहन वरळीकर, हृद्वि हेमंत पवार, ओजस दीपक आलम, द्वितीय क्रमांक (४ पारितोषिके) : रोशनी राजू राठोड, आरव सुरेश आंजर्लेकर, आकृती संतोष जायस्वार, स्वरा नथुराम कुरतडकर, तृतीय क्रमांक (४ पारितोषिके): चिराग उमेश काते, शिवन्या मनोहर घुगे, यशश्री सफल रूमडे, प्रणित अनिल लोहार, उत्तेजनार्थ पारितोषिक (८ पारितोषिके): त्रिशा संदेश आंबेकर, श्रृता पंकज सावंत, निल महेश मोडखरकर, गार्गी महेंद्र हळंदे, विश्वेश वैभव राऊत, खुशी हर्षद तांडेल, जिया अर्जुन सहानी, स्वराज समीर उसापकर.

Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई