महाआवास अभियानात नाशिक जिल्हा, विभाग राज्यात प्रथम

  45

महाजन यांच्याकडून अभिनंदन : १ लाख ४५ हजार लाभार्थ्याना मंजुरीपत्र


नाशिक: हक्काचे घर हे गरिबाला बंगल्यासारखेच आहे. महा आवास अभियान अंतर्गत गरीब माणसाचे स्वप्न आपण पूर्ण करत आहोत. ग्रामविकास मंत्री असताना देशात पहिला क्रमांक आला होता आज या अभियानात नाशिक जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर असून नाशिक विभागाने विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली उद्दिष्टपूर्तीमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी अभिनंदन केले.


जिल्ह्यातील १ लाख ४५ हजार ७२७ घरकुल लाभार्थ्याना मंजूरी पत्र देण्यात आले तर ८० हजार घरकुल लाभार्थ्याच्या खात्यावर घरकुलाच्या पहिला हप्त्याचे वितरण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित कार्यक्रमात जलसंपदा तथा आपत्ति व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंजुरी पत्र वितरण करण्यात आले.



ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी, गतीमान, दर्जेदार अंमलबजावणी व लोकसहभागासाठी राज्यात महा आवास अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शासनाकडून लाभार्थ्यांना मंजूरी पत्र देणे व पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पुणे येथे आयोजित या कार्यक्रमासाठी गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आदी उपस्थित होते.


या कार्यक्रमास नाशिक येथून दुरदृश्य प्रणालीद्वारे राज्याचे जलसंपदा तथा आपत्ति व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन व शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे मालेगाव येथून तर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले .कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, आयुक्त कार्यालयातील डॉ. सारिका बारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जिल्ह्यातील विविध लाभार्थी यांच्यासह अधिकारी,


कर्मचारी आदी उपस्थित होते. दरम्यान,राज्याच्या एकूण घरकुल उद्दिष्टपैकी २७. ६३ म्हणजेच ५ लक्ष ४३ हजार ४२४ घरांचे उद्दिष्ट नाशिक विभागाला असून नाशिक विभागाने विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली उद्दिष्टपूर्तीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. संख्यात्मकदृष्टया नाशिक विभागातील ५ पैकी ४ जिल्हे राज्यात प्रथम पाचमध्ये आहेत.

Comments
Add Comment

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये

Maharashtra Monsoon Session 2025: इंद्रायणी पुलाचा मुद्दा विधानसभेत, पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल झाली चर्चा

मुंबई: राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारी ३० जूनपासून सुरू झाले असून, आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा

म्हाडा छत्रपती संभाजीनगर, नाशिक मंडळातर्फे १४१८ निवासी सदनिका व भूखंडांसाठी सोडत

सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीसह अर्ज भरणा प्रक्रिया सुरू मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर व

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक