

मणिपूरच्या चार जिल्ह्यांतून १७ अतिरेक्यांना अटक
इंफाळ : मागील २४ तासांत मणिपूरच्या चार जिल्ह्यांतून १७ अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, बिष्णुपुर, काकचिंग या चार ...
आंतरराष्ट्रीय कराराचे पालन होणार नसेल, शांतता नांदणार नसेल तर अमेरिका गाझा पट्टी स्वतःच्या ताब्यात घेईल. गाझात अमेरिकेच्या परवानगीशिवाय कोणालाही राहता येणार नाही; असेही ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे गाझा पट्टीत भीतीचे वातावरण आहे. गाझा पट्टी या चिंचोळ्या भागात सुमारे २४ लाख नागरिक दाटीवाटीने वस्तीला आहेत. नुकत्याच झालेल्या इस्रायल - हमास संघर्षावेळी लाखो नागरिकांनी गाझातून पलायन केले. हे नागरिक शस्त्रसंधी झाल्यामुळे परतू लागले आहेत. पण गाझात वातावरण स्थिरस्थावर होण्याआधीच हमासने इस्रायलला मृतदेह पाठवले. यामुळे तणाव वाढला आहे. ट्रम्पनी आखाती देशांपुढे एक नवा प्रस्ताव सादर करण्याची तयारी केली आहे.

Mumbai Breaking : गोरेगाव फिल्मसिटी जवळ असलेल्या झोपड्यांना भीषण आग!
मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध असलेली चित्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिल्मसिटी जवळ वसलेल्या झोपड्यांना भीषण आग ...
गाझातील सुमारे २४ लाख नागरिकांचे इजिप्त आणि जॉर्डनमध्ये पुनर्वसन करावे आणि गाझा पट्टी ही अमेरिकेच्या नियंत्रणात ठेवावी, असा प्रस्ताव ट्रम्प सुचविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण लाखो नागरिकांचे गाझाबाहेर पुनर्वसन करण्याला आखाती देशांचा विरोध आहे. ट्रम्प यांचा प्रस्ताव नव्या प्रश्नांना जन्म देईल, अशी चिंता आखाती देश व्यक्त करत आहेत.
इस्रायलची भूमिका
हमासने कराराचे पालन करुन नागरिकांना सुरक्षितरित्या सोडणे अपेक्षित आहे. पण हमासकडून शांतता काळात चार मृतदेह आले आहेत. हमासचे म्हणणे आहे की, दोन मुलं, त्यांची आई आणि एक व्यक्ती अशा चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू इस्रायलच्या हल्ल्यात झाला, असे हमास सांगत आहे. पण शस्त्रसंधी सुरू आहे. इस्रायलने कारवाई केलेली नाही. यामुळे हमासच्या दाव्याची सत्यता तपासणे आवश्यक आहे. मिळालेल्या चार मृतदेहांमध्ये एकाही महिलेचा मृतदेह नाही; असेही इस्रायलचे म्हणणे आहे. हमासने पाठवलेल्या मृतदेहांचे शवविच्छेदन होईल, मृतदेहांची डीएनए तपासणी पण केली जाईल; असे इस्रायल सरकारने जाहीर केले आहे.