Monday, May 12, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २१ फेब्रुवारी २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २१ फेब्रुवारी २०२५

पंचांग


आज मिती माघ कृष्ण अष्टमी १२.०० पर्यंत नंतर नवमी शके १९४६. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग व्याघात. चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २ फाल्गुन शके १९४६. शुक्रवार, दिनांक २१ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.०३, मुंबईचा चंद्रोदय ०२.०८ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.४१, मुंबईचा चंद्रास्त १२.१६ राहू काळ ११.२५ ते १२.५२. जागतिक मातृभाषा दिन, आनंदस्वामी पुण्यतिथी - जालना, व्रजभूषण महाराज पुण्यतिथी, शीवर, भानुदास महाराज जयंती-वायगाव, शुभ दिवस - दुपारी ३ ५३ पर्यंत.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. कार्यक्षेत्रात उत्तम संधी मिळेल.
वृषभ : समाजातील सन्माननीय व प्रतिष्ठित लोकांपासून काही लाभ संभवतात.
मिथुन : लहान-मोठे आर्थिक व्यवहार सावधानतेने करण्याची गरज आहे.
कर्क : नोकरी-व्यवसायात काहीवेळा प्रतिकूलता जाणवेल.
सिंह : इतरांच्या म्हणण्याला उचित प्राधान्य देणे हिताचे ठरेल.
कन्या : आत्मपरीक्षण करून चुका टाळता येतील.
तूळ : आपल्या मित्र परिवारातील नेमके विरोधक कोण हे जाणून घ्या.
वृश्चिक : मैत्रीत पैशाचे व्यवहार टाळा. आर्थिक व्यवहारात लिखापढी आवश्यक.
धनू : काही बाबतीत आपल्याला धाडशी निर्णय घ्यावे लागतील.
मकर : इतरांना मदत करण्याची इच्छा होईल. आर्थिक बाजू ठीक राहील.

कुंभ : खर्चात झालेली अनपेक्षित वाढ आपल्याला आश्चर्यचकित करेल.
मीन : नोकरीमध्ये वातावरण सर्वसामान्य राहील.
Comments
Add Comment