सिंधुदुर्ग : कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील भराडी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक आतुर झाले आहेत. वस्त्रालंकारांनी सजलेले देवीचे रूप पाहण्याचे भाग्य यात्रेच्या दिवशी लाभत असल्याने भाविकांचा महापूर शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी आंगणेवाडीत उसळणार आहे. नवसाला पावणाऱ्या व भवानीचे रूप असलेल्या भराडी मातेच्या दर्शनासाठी विविध पक्षांचे राजकीय नेते, खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक येणार असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. आंगणे कुटुंबीय, जिल्हा प्रशासनाने यात्रेची पूर्ण सज्जता केली आहे. आंगणेवाडी आणि परिसर भाविकांनी गजबजुन गेला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात आंगणेवाडीच्या भराडीदेवीच्या उद्यापासून होणाऱ्या यात्रेसाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पालकमंत्री नितेश राणे यात्रेच्या नियोजनावर लक्ष देऊन आहेत. त्यानी यात्रास्थळाची पाहणी करून भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. उद्या पहाटे ३ वाजल्यापासून दर्शन आणि ओटी भरणे कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. दर्शनासाठी एकूण ९ रांगांची व्यवस्था करण्यात आलीआहे.
यात्रेसाठी मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, सेलिब्रिटी मोठ्या संख्येनं भेट देतात त्यामुळे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरा आणि ड्रोनची नजर संपूर्ण यात्रेवर राहणारआहे. सहा पोलीस उपाधीक्षक, १३ पोलीस निरीक्षक, ३२ सहाय्य्क पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, ५०० पोलीस अंमलदार, २ दंगल नियंत्रण पथक, १५० होमगार्ड आणि घातपात नियंत्रण पथक नेमण्यात आलं आहे. राज्य परिवहन महामंडळाने देखील जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे. रविवारी २३ फेब्रुवारीला मोड यात्रेने या वार्षिक यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…
सध्या आयपीएलचा सीझन रंगात आला आहे. संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून क्रिकेटप्रेमी टीव्ही किंवा मोबाईलसमोर ठाण मांडून…
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांचे मत मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI)…
मुंबई : शिक्षकांसाठी ड्रेसकोड ठरवण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा विचाराधीन आहे. प्रत्येक जिल्ह्याला…
काही दिवसांपूर्वी २६/११ चा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याचं भारतात प्रत्यार्पण झालं. त्यानंतर…