Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीDelhi News : आजपासून राजधानी दिल्लीत अ. भा. मराठी साहित्य संमेलन

Delhi News : आजपासून राजधानी दिल्लीत अ. भा. मराठी साहित्य संमेलन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या संमेलनाचे होणार उद्घाटन

नवी दिल्ली : ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारपासून (दि. २१) सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. डॉ. तारा भवाळकर संमेलनाध्यक्षा आहेत, तर ज्येष्ठ नेते शरद पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलेच संमेलन आहे आणि राजधानी दिल्लीत हे संमेलन होत आहे. सरहद,पुणे या संस्थेच्या वतीने संमेलनाचे आयोजन केले जात आहे. २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत म्हणजेच तालकटोरा स्टेडियममध्ये हे साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाच्या निमित्ताने ३ दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. यामध्ये कविता, पुस्तक प्रकाशन, चर्चा, परिसंवाद, मुलाखती असे कार्यक्रम होणार आहेत.

Nitesh Rane : आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले गावी हेवा वाटेल, असे स्मारक उभे करू!

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत दिल्लीतील विज्ञान भवनात आज (शुक्रवारी) दुपारी ३.३० ला साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. उर्वरित सर्व कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीमध्ये म्हणजेच तालकटोरा स्टेडियम येथे होणार आहेत. दरम्यान, उद्घाटन सोहळ्यास पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा

डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. राज्यातील साहित्यिकही या साहित्य सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता उद्घाटनाचे दुसरे सत्र संमेलनस्थळी होणार असून याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री अाशीष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -