Wednesday, March 19, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणNitesh Rane : आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले गावी हेवा वाटेल,...

Nitesh Rane : आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले गावी हेवा वाटेल, असे स्मारक उभे करू!

देवगड  : “वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले या गावी संपूर्ण देशाला आदर्श ठरेल असे स्मारक उभे करू, या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणण्याचा आपला संकल्प आहे. बाळशास्त्रींनी त्यांच्या लहान वयातच केलेल्या कामाचा परिचय होऊ शकेल या पद्धतीने स्मारकाचे महत्त्व वाढविणार आहे. आजच्या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांनी जो एकत्र येत एकसंध दाखविला तो निश्चितच कौतुकास्पद आहे. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत, हे जिल्ह्यासाठी ॲसेट असल्याचे मत मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.

Mumbai Breaking : गोरेगाव फिल्मसिटी जवळ असलेल्या झोपड्यांना भीषण आग!

वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती त्यांच्या मूळ गावी, पोंभुर्ले येथे साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार अजित गोगटे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, तहसीलदार आर. जे.पवार, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर, गणेश जेठे, माधव कदम, संतोष वायंगणकर, देवगड तालुका पत्रकार समितीचे तालुकाध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, गावच्या सरपंच प्रियंका धावडे, पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष राऊळ आदी उपस्थित होते.

जिल्हा तालुका पत्रकार संघातील पत्रकारांनी एकत्र बसून याबाबत सविस्तर चर्चा करा, तर मलाही आवडेल. जागा, संबंधित विषय आता तुम्ही मार्गी लावणे गरजेचे आहे. कारण आता आपणाला थांबायचे नाही, जिल्ह्यातील पत्रकार भवन ज्या पद्धतीत उभे केले त्याप्रमाणे ही देखील वस्तू आपणाला लवकर मार्गी लावायची आहे. त्यामुळे आता मी थांबणारा नाही. या स्मारकासाठी लागणारा सर्व निधी व मदत आपण द्यायला तयार आहोत, असे नामदार नितेश राणे यांनी सांगितले. जांभेकर स्मारकाच्या रस्त्यालगत आकर्षक कसे शिल्प उभारण्याचा संकल्पही यावेळी त्यांनी
बोलून दाखवला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -