Saturday, May 10, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

Ashish Patil : लावणी किंग आता परदेशात रंगवणार ‘रसरंगांचं कारंजं!

Ashish Patil : लावणी किंग आता परदेशात रंगवणार ‘रसरंगांचं कारंजं!

मुंबई : ‘लावणी किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेला लोकप्रिय कोरिओग्राफर आशिष पाटील (Ashish Patil) याने महाराष्ट्राची शान असलेल्या लावणीला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. या कलेच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करताना नृत्यसंस्कृती जपली जावी या उद्देशाने 'सुंदरी’ The history of Lavani (अदा ताल शृंगार) या नव्या शो ची संकल्पना आणून आशिष पाटीलने ती यशस्वी केली आहे. मुंबईत या 'सुंदरी’शोला रसिंकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर आता आशिष परदेशातही त्याचं रसरंगांचं कारंजं रंगवणार आहे.



आशिष पाटील अमेरिकेत 'सुंदरी’ या शोचा नजराणा दाखवणार आहे. जुलै महिन्यात अमेरिकेत हा शो रंगणार असून यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना अमृता खानविलकर आणि आशिष पाटील या दोघांच्या अदाकारीने ही नृत्य मैफिल सजणार आहे.


लय-तालाचा आविष्कार, रंगमंचीय सहजता, आत्मविश्वास या सर्व गोष्टींच्या जोरावर विलोभनीय नृत्याविष्काराचे दर्शन 'सुंदरी' या शोमधून घडविले आहे. तालसौंदर्य उलगडत रसिकांसमोर झालेले हे सादरीकरण आणि त्याचा आस्वाद आता अमेरिकेतील कलाप्रेमींना घेता येणार आहे.

Comments
Add Comment