'इंडियाज गॉट लेटेंट' वादानंतर केंद्र सरकारने ओटीटीसाठी जाहीर केल्या नव्या मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली :'इंडियाज गॉट लेटेंट' मुळे सुरू झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतात सक्रीय असलेल्या सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नव्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. कार्यक्रम प्रसिद्ध करताना तो कोणत्या वयोगटासाठी आहे हे जाहीर करावे; असे केंद्र सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्मना बजावले आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २०२१ चे पालन करण्याचे निर्देश केंद्र सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्मना दिले आहेत. माहिती तंत्रज्ञान कायदा २०२१ चे उल्लंघन केल्यास संबंधित ओटीटी प्लॅटफॉर्मवर कारवाई करणार असल्याचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे.



'इंडियाज गॉट लेटेंट'च्या एका भागात यू ट्युबर रणवीर अलाहाबादिया याने केलेल्या वक्तव्यावरुन सुरू झालेला गदारोळ अद्याप शमलेला नाही. पोलिसांनी या प्रकरणात यू ट्युबर रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आई वडिलांविषयी यू ट्युबर रणवीर अलाहाबादियाने केलेल्या वक्तव्यावरुन वादाला सुरुवात झाली. सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला फटकारले आणि पासपोर्ट ठाणे पोलिसांकडे जमा करण्यास सांगितले. मागील काही दिवसांपासून रणवीर अलाहाबादिया गायब आहे. त्याच्या मुंबईतील घराला कुलुप आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला देश सोडण्यास बंदी घातली आहे. याच प्रकरणात राज्याच्या सायबर सेलने ५० सेलिब्रेटींना समन्स बजावले आहे. महाराष्ट्र सायबर सेल सध्या इंडियाज गॉट लेटेंटच्या सर्व भागांची तपासणी करत आहे. यू ट्युबवरील कार्यक्रमासाठी पैसा नेमका कोणत्या मार्गाने येत होता आणि कसा वापरला जात होता, याचाही पोलिस तपास करत आहेत.
Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीसह देशातील वीस मुलांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’

नवी दिल्ली : वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील वीस मुलांना

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारची डीएसपींना धडक

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे एक धक्कादायक घटना घडली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यातील एका

राष्ट्रपती मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार आहेत. नियोजीत कार्यक्रमानुसार राष्ट्रपती

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले