दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत अ गटाच्या दुसऱ्या साखळी सामन्यात बांगलादेश आणि भारत यांच्यात दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या बांगलादेशने ४० षटकांत ५ बाद १६५ धावा एवढीच मजल मारली. जाकर अली आणि तौहिद हृदयॉय हे दोन अर्धशतकवीर मैदानावर पाय रोवून उभे आहेत. याआधी प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचे पाच फलंदाज ३५ धावांत परतले.
Ind vs Ban Pitch Report : भारत – बांगलादेश सामन्यासाठी कशी असेल दुबईची खेळपट्टी ?
कर्णधार असलेल्या नजमुल हुसेन शांतो, सौम्या सरकार आणि यष्टीरक्षक असलेल्या मुशफिकुर रहीम हे तीन फलंदाज शून्य धावा करुन परतले. सलामीवीर तन्झिद हसनने २५ तर मेहदी हसन मिराजने पाच धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमी आणि अक्षर पटेलने प्रत्येकी दोन तर हर्षित राणाने एक बळी घेतला.