दुबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत आज (गुरुवार २० फेब्रुवारी २०२५) दुपारी भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना दुबईत होणार आहे. हा साखळी सामना जिंकून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी स्वतःची बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतील. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अ गटाच्या पहिल्या साखळी सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला. या सामन्यात न्यूझीलंडचा ६० धावांनी विजय झाला. आज अ गटाच्या दुसऱ्या साखळी सामन्यात भारत आणि बांगलादेश आमनेसामने असतील. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू होणार आहे. या सामन्यासाठी नव्या कोऱ्या खेळपट्टीचा वापर होणार आहे. यामुळे खेळपट्टी गोलंदाजीसाठी पोषक असेल की फलंदाजीसाठी, नाणेफेक जिंकणाऱ्याने आधी कोणता पर्याय निवडावा यावरुन तर्कवितर्क सुरू आहेत.
दुबईच्या स्टेडियमध्ये दोन नव्या खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. या खेळपट्ट्यांचा वापर अद्याप झालेला नाही. दोन्ही खेळपट्ट्या नव्या आहेत. यापैकी कोणत्याही एका खेळपट्टीचा वापर झाला तरी सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना फायदा होईल. नंतर फिरकीपटूंना फायदा होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. भारतीय संघात रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंद या पाच फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला आहे. जर खेळपट्टी या गोलंदाजांसाठी लाभदायी ठरली तर भारतीय संघ गोलंदाजांच्या मदतीने प्रतिस्पर्ध्यावर अंकुश ठेवण्यात यशस्वी होऊ शकेल.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रविंद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती
बांगलादेश : नजमुल हुसेन शंटो (कर्णधार), सौम्य सरकार, तंजीद हसन, तौहीद हृदय, मुश्फिकुर रहीम, महमुदुल्लाह, जेकर अली अनिक, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेज हुसैन इमोन, नसुम अहमद, तंजीम हसन साकिब, नाहिद राणा
दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम
- सर्वोच्च धावसंख्या : ५ बाद ३५५ धावा, इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान
- सर्वात कमी धावसंख्या : सर्वबाद ९१ धावा, नामीबिया विरुद्ध यूएई
- सर्वात मोठा विजय : १६२ धावा, स्कॉटलंड विरुद्ध पीएनज
- सर्वात कमी फरकाने झालेला विजय : २ धावा, दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान