दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील अ गटाच्या दुसऱ्या साखळी सामन्यात दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या बांगलादेशचा डाव ४९.४ षटकांत २२८ धावांत आटोपला. बांगलादेशची अवस्था पाच बाद ३५ अशी होती त्यावेळी त्यांचा डाव लवकर आटोपणार असे वाटत होते. पण शतकवीर तौहिद हृदयॉय आणि अर्धशतकवीर जाकर अली तसेच रिशाद हुसेन या तीन फलंदाजांच्या प्रयत्नांमुळे बांगलादेशने सर्वबाद २२८ धावा केल्या.
Innings Break!
Bangladesh are all out for 2⃣2⃣8⃣
5⃣ wickets for Mohd. Shami
3⃣ wickets for Harshit Rana
2⃣ wickets for Axar PatelOver to our batters 💪
Scorecard ▶️ https://t.co/ggnxmdG0VK#TeamIndia | #BANvIND | #ChampionsTrophy pic.twitter.com/zgCnFuWSwi
— BCCI (@BCCI) February 20, 2025
बांगलादेशकडून तन्झिद हसनने २५, सौम्या सरकारने शून्य, नजमुल हुसेन शांतोने (कर्णधार) शून्य, मेहदी हसन मिराजने पाच, तौहिद हृदयॉयने १००, मुशफिकुर रहीमने (यष्टीरक्षक) शून्य, जाकर अलीने ६८, रिशाद हुसेनने १८, तन्झीम हसन साकिबने शून्य, तस्किन अहमदने तीन, मुस्तफिजुर रहमानने नाबाद शून्य धावांचे योगदान दिले. बांगलादेशला ९ अवांतर मिळाले. भारताकडून मोहम्मद शमीने पाच, हर्षित राणाने तीन, अक्षर पटेलने दोन बळी घेतले. शमीने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात सौम्या सरकार, मेहदी हसन मिराज, जाकर अली, तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद या पाच जणांना बाद केले.
मोहम्मद शमीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०२ बळी घेतले. त्याने आयसीसीच्या विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधून आतापर्यंत ६० बळी घेतले आहेत. तो आयसीसीच्या विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज झाला आहे. एकदिवसीय क्रिकेट या प्रकारात १०४ सामन्यात १०३ डावात ५१४० चेंडू टाकून ४७७५ धावा देत २०२ बळी घेतले. त्याची सरासरी २३.६४ एवढी आहे.
Ind vs Ban Pitch Report : भारत – बांगलादेश सामन्यासाठी कशी असेल दुबईची खेळपट्टी ?
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील बांगलादेश विरुद्धच्या साखळी सामन्यात भारताच्या विराट कोहलीने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या विक्रमशी बरोबरी साधली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंमध्ये अझरुद्दीन आघाडीवर आहे. त्याने १५६ झेल घेतले आहेत. या विक्रमाशी विराट कोहलीने बांगलादेश विरुद्धचा सामना सुरू असताना बरोबरी साधली. मोहम्मद शमीच्या चेंडूवर जाकर अलीने फटकावलेला चेंडू विराट कोहलीने झेलला. हाच विराट कोहलीचा एकदिवसीय क्रिकेटमधील १५६ वा झेल आहे.