Nagpur News : बांगलादेशच्या विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग

नागपूर : बांगलादेशातील ढाका येथून दुबईला जाणाऱ्या विमानाची बुधवारी मध्यरात्रीनंतर नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानातील प्रवासी नागपुरात खोळंबून बसले असून संबंधित विमान कंपनीकडून त्यांची व्यवस्था करण्यात आली. तांत्रिक बिघाडामुळे नागपुरात उतरवलेले हे विमान दुरुस्तीनंतर आज, गुरुवारी रवाना होणार असल्याची माहिती नागपूर विमानतळाचे वरिष्ठ संचालक आबीद रूही यांनी दिली. नागपूर विमानतळाच्या टर्मीनल बिल्डींगजवळ उभे करण्यात आलेल्या या विमानात १२ क्रू मेंबर्स आणि ३९६ प्रवासी असून बांगलादेश एअर लाईन्सचे कर्मचारी प्रवाशांच्या सेवेत होते. यापूर्वी १० नोव्हेंबर २०२४ रोजी विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन मिळाल्याने नागपूरहून पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाचे आपत्कालीन लँडींग करण्यात आले होते.



बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर विमान रायपूर विमानतळावर उतरवण्यात आले. याशिवाय २० जून २०२४ रोजी यूएस-बांगला एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक बीएस-३४३ या विमानाच्या इंजीनमध्ये बिघाड झाल्यामुळे इमर्जंसी लॅडिंग करण्यात आले होते. प्रवासादरम्यान विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड निर्माण झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्यानुसार, विमानाच्या इमर्जन्सी लॅडिंगसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संपर्क साधण्यात आला. विमानतळ प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळताच विमानाचे सुरक्षितरित्या इमर्जन्सी लॅडिंग झाले. यावेळी प्रवाशांना विमानतळावर ९ तास मुक्काम करावा लागला होता.

Comments
Add Comment

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई

शेतकऱ्यांसाठी मंत्री महाजनांचा मोठा निर्णय, सुपूर्द केला वर्षभराचा ‘पगार’

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी मंत्री गिरीश महाजन यांनी

अमरावती महानगरपालिकेला ई-बस डेपो-व चार्जींग सुविधेसाठी बडनेरा येथील जमीन

अमरावती : अमरावती महापालिकेला केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.ई बस योजनेतून मिळालेल्या ई-बस डेपो व चार्जींग