रेशन दुकानातून मिळणारा गहू होणार कमी

मुंबई : राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने स्वस्त धान्य दुकान अर्थात रेशन दुकानातून वाटप करण्यात येणाऱ्या गव्हाचे प्रमाण कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गरीब लाभार्थ्यांना आता गहू कमी मिळणार असून सर्वसामान्यांच्या ताटातून चपाती कमी होऊ शकते.



शासनाने लाभार्थ्यांना तांदुळाचे वाटप मात्र वाढवून दिले आहे. सदर बदल मार्च २०२५ पासून लागू होणार असून लाभार्थ्यांना धान्याचे वाटप मोफत करण्यात येणार आहे. अंत्योदय कार्डधारकांना एका कार्डामागे १५ किलो गहू व २० किलो तांदूळ तर प्राधान्य गटातील प्रत्येक लाभार्थ्याला दोन किलो गहू व तीन किलो तांदुळाचे वाटप करण्यात येते.



परंतु त्यामध्ये आता शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने बदल केला आहे. लाभार्थ्यांच्या हिस्स्यातील गव्हाला कात्री लावण्यात आली असून त्याबदल्यात लाभार्थ्यांना तांदुळ मिळेल.

Comments
Add Comment

Multi Tunneling Mumbai :मुंबईत उभारणार बोगद्यांचे जाळे ; ४,३९२ कोटींचा खर्च अपेक्षित

मुंबई : मुंबईत सातत्याने पायाभूत सुविधांचे जाळे उभारले जात असले, तरी रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या अद्याप

The Mithi River : मिठी नदीतील भराव संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठीच

मुंबई : मिठी नदीत कंत्राटदाराकडून बांधकामाचा राडारोडा (डेब्रीज) टाकून आणि त्यात चिखल मिसळून भ्रष्टाचार केला जात

Old Building : जुन्या इमारती अतिधोकादायक दाखवण्यामागे सल्लागारांचा खेळ?

मुंबई  : मुंबईतील ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट (संरचनात्मक परीक्षण) करताना, अनेक सल्लागार

Devendra Fadnavis : इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर

मुंबई : इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा परिणाम देशातील पेट्रोलियम

Mrinal Tai Gore Flyover Extension : अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगावकरांचा वेळ वाचणार, मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोडदरम्यानच्या मृणालताई गोरे

The Fort owners : किल्लेदारांनी बोटीतून केली मिठी नदीची सैर... दाखवला नदीत कचऱ्यासह तीन फुटांपर्यंतचा गाळ

मुंबई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात असून सत्ताधारी पक्षाकडून प्रत्येक