कल्याण : मालमत्ता कर उत्त्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. मालमत्ता कर थकीत ठेवणा-या मिळकतधारकांना कराचा भरणा करणेबाबत वारंवार नोटीस पाठवनूही त्यास प्रतिसाद मिळत नाही. याची गंभीर दखल घेवून थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महानगरपालिकेने १/अ, २/ब व ३/क प्रभागातंर्गत १५ मालमत्ता जप्त केल्या असून, त्याचा लिलाव १७ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आला. सदर लिलावास प्रतिसाद मिळालेला नसल्याने, या मिळकतींचा फेरलिलाव काढण्यात येणार आहे.
नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा वेळेत व नियमित करावा यासाठी महानगरपालिकेकडून वेळोवेळी आवाहन केले जाते.मात्र,अनेक मालमत्ताधारकांकडून मालमत्ता कर थकवला जातो. मालमत्ता जप्तीची कारवाई करुनही थकबाकी न भरता नोटीसला प्रतिसादही दिला जात नाही. अशा,थकबाकीदारांच्या जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याची कारवाई सुरु आहे.थकीत मालमत्ता कराबाबत सातत्याने जप्ती/अटकावणी व लिलावाची कारवाई महानगरपालिकेतर्फे केली जाते. तरी, अशी कठोर कारवाई टाळण्याकरीता नागरीकांनी मालमत्ता कराचा भरणा त्वरीत करुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन कर विभागामार्फत करण्यात येत आहे.