रेखा गुप्ता मुख्यमंत्री, प्रवेश शर्मा उपमुख्यमंत्री आणि विजेंद्र गुप्ता विधानसभेचे स्पीकर
नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांचे नाव निश्चित झाले आहे. आरएसएसने त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला, जो भाजपाने स्वीकारला. भाजपाकडून दिल्लीच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार, रेखा गुप्ता मुख्यमंत्री, परवेश साहेब सिंह वर्मा उपमुख्यमंत्री आणि विजेंद्र गुप्ता विधानसभेचे स्पीकर असणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ११ दिवसांनी आज सायंकाळी झालेल्या भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी (२० फेब्रुवारी) रामलीला मैदानावर दुपारी १२.३५ वाजता होणार आहे. दिल्लीच्या मुख्य सचिवांनी पाठवलेल्या निमंत्रणात मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या शपथविधीचाही उल्लेख आहे.
या सोहळ्याला पीएम मोदींसह अनेक दिग्गज उपस्थित राहणार
या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व केंद्रीय मंत्री, भाजपा आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. याशिवाय उद्योगपती, सिनेतारका, क्रिकेटपटू, संत, मुत्सद्दीही येणार आहेत. दिल्लीत सुमारे १६ हजार लोकांना बोलावण्यात आले आहे.
भाजपकडून दिल्लीच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार, रेखा गुप्ता मुख्यमंत्री, प्रवेश शर्मा उपमुख्यमंत्री आणि विजेंद्र गुप्ता विधानसभेचे स्पीकर असणार आहेत. दिल्लीसाठी महिला नेतृत्वाला संधी देत भाजपने लाडक्या बहिणींची मनं जिंकली आहेत.
दिल्लीतील रामलीला मैदानावर भाजपच्या आणि दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील या सोहळ्यासाठी दिल्लीला जाणार आहेत.
दरम्यान, संघविचारक आणि प्रचारक राहिलेल्या रेखा गुप्ता यांना भाजपने दिल्लीच्या तख्तावर बसवले आहे. रेखा गुप्ता ह्या आरएसएसच्या सक्रीय सभासद असून शालीमार बाग विधानसभेच्या आमदार आहेत.