Prasad khandekar : प्रसाद खांडेकर आणि श्लोक खांडेकर ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात एकत्र

मुंबई : वडील-मुलाचे समीकरण हे नेहमीच मित्रत्वाचे असते. लहानपणापासून प्रत्येक मुलासाठी वडील आदर्श असतात, हिरो असतात. वडिलांसारखंच कर्तृत्ववान होण्याची त्यांची इच्छा असते. चित्रपटसृष्टीत बाप-लेक एकत्रित झळकण्याची परंपरा आहेच. या यादीत आणखी एका जोडीचा समावेश होणार आहे. अभिनेता प्रसाद महादेव खांडेकर आणि त्यांचा मुलगा श्लोक खांडेकर आगामी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करणार आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत श्लोक खांडेकर अभिनयाचा ‘श्रीगणेशा’ करणार आहे.



आठ वर्षांचा इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या श्लोकने अभिनयाच्या आवडीतून या चित्रपटातील जॉनी लिव्हर पाध्ये ही भूमिका साकारली आहे. त्याची मजेशीर व्यक्तिरेखा काय धमाल उडवणार? हे ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात पाहणं रंजक असणार आहे. गारठणाऱ्या थंडीत स्विमिंगपूलमध्ये शूट ते स्केटिंग वरचा सीन या सगळ्या गोष्टी श्लोकाने अतिशय सफाईदारपणे केल्याने लेकाचा अभिमान तर आहेच, पण या चित्रपटाच्या निमित्ताने आम्हांला एकत्र प्रेक्षकांचं मनोरंजन करायला मिळतंय हे आमच्यासाठी आनंददायी असल्याचं प्रसाद खांडेकर सांगतात.


नुकताच या चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. रियुनियनच्या सेलिब्रेशनसाठी एकत्र जमलेल्या पण काही विचित्र गोष्टींमुळे कचाट्यात सापडलेल्या मित्रांची धमाल गोष्ट म्हणजे 'चिकी चिकी बुबूम बुम’ हा चित्रपट. नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित, आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने येणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. छायांकन गणेश उतेकर यांचे आहे.


धमाल, मस्ती, हास्याचे स्फोट उडवत २८ फेब्रुवारीला 'चिकी चिकी बुबूम बुम’ प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी देणार आहे.

Comments
Add Comment

Disha Patani and Talwinder: बॅालिवुड अभीनेत्री पंजाबी सिंगर तलविंदरला करते डेट? नक्की काय आहे विषय..

Disha Patani and Talwinder: बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दिशा पाटनीचे नाव कायमच आघाडीवर असते. तिची टोन्ड

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

नॉर्थ अमेरिकेत रणवीर सिंगचा दबदबा; ‘धुरंधर’चा $20 मिलियन क्लबमध्ये ऐतिहासिक प्रवेश

रणवीर सिंगने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की भारतीय चित्रपट आता केवळ देशाच्या सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत.

भारताच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या संघटनेचा सिनेमॅटिक प्रवास उलगडणारा ‘शतक’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या अद्भुत आणि अज्ञात वाटचालीचा मागोवा मुंबई : यंदाचे वर्ष (२०२६)

गोव्यातील एक बीच, एकच वेळ … कार्तिक आर्यनसोबत कोण होती ही ‘मिस्ट्री गर्ल’?

मुंबई : गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरून समोर आलेल्या काही फोटोंमुळे बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा

इंडियन आयडॉलमधून चमकलेला आवाज शांत; गायक प्रशांत तमांग यांचे वयाच्या ४३व्या वर्षी निधन

मुंबई : मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक बातमी समोर आली असून, ‘इंडियन आयडॉल’च्या तिसऱ्या पर्वातून देशभर लोकप्रिय