Chhaava : 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर तुफानी! अवघ्या चार दिवसांत कमावले तब्बल २०० कोटी

  97

मुंबई : विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'छावा' (Chhaava) चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करत आहे. छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारित या ऐतिहासिक चित्रपटाने पहिल्या दिवशीच २८.५० कोटींचा दमदार गल्ला (Box Office Collection) जमवला होता. त्यानंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने जगभरात तब्बल २०० कोटींची कमाई केली आहे.



मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मिती झालेल्या छावाने पहिल्या दिवशीच २८.५० कोटींचा दमदार गल्ला जमवला होता. त्यानंतर चित्रपटाच्या उत्कृष्ट कथानकामुळे आणि तगड्या स्टारकास्टमुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी आणखी मोठी वाढ झाली आणि तब्बल ३४ कोटींची कमाई झाली. आता तिसऱ्या दिवशी गाठला ८६ कोटी रुपयांचा टप्पा. त्यानंतर चौथ्या दिवशी या चित्रपटाने जगभरात तब्बल २०० कोटींची कमाई केली आहे.

ट्रेड ट्रॅकिंग या वेबसाईटच्या आकडेवारीनुसार छावा या चित्रपटाने चार दिवसांत देशात आणि देशाबाहेर अशी मिळून बॉक्स ऑफिसवर तब्बल १४० कोटी रुपयांची कमाई सोमवारपर्यंत केली होती. त्यानंतर कलेक्शनमध्ये घट झाली आणि सोमवारी केवळ २४ कोटी कमावले. मात्र या चित्रपटाचा वारू बॉक्स ऑफिसवर असाच उधळत आहे. दुसरीकडे परदेशाच्या चित्रपटाने आतापर्यंत २७ कोटी कमावले. ज्यामुळे जगभरातील चार दिवसांची एकूण कमाई १९५.६० कोटींवर पोहोचली. त्यामुळे लवकरच हा चित्रपट २०० कोटींचा टप्पा ओलांडणार आहे.

या चित्रपटाची देशभरातील कमाईचा आकडा वाढत असताना जगभरातीलही कमाईचा आकडा वाढताना दिसत आहे. अनेक ठिकाणी चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल म्हणून दाखवले जात आहे. विकी कौशलच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून भरभरुन दाद मिळत आहे. बिगेस्ट ऑपनरमध्ये अनेक बॉलिवूड चित्रपटांनाही छावा चित्रपटाने मागे टाकले आहे.

Comments
Add Comment

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अलिबागमध्ये चित्रीकरणाला सुरुवात

अलिबाग: दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व सांगणारा नवा चित्रपट 'क्रांतिज्योती

Bigg Boss 19 मध्ये आंतरराष्ट्रीय तडका, माईक टायसन आणि द अंडरटेकरची एन्ट्री होणार?

मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो "बिग बॉस" चा

संत विचारांनी भारावलेली कथा ‘फकिरीयत’

‘फकिरीयत’ या आगामी हिंदी चित्रपटाचा भव्य ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य

‘जागरण गोंधळ’ या गाण्याला गणेश चंदनशिवे यांचा आवाज

अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही जोडी ‘आरपार’ या सिनेमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर

‘जेलर २’मध्ये रजनीकांत - मिथुन यांची जोडी पुन्हा झळकणार

साउथचा सुपरस्टार आणि चाहत्यांच्या मते ‘भगवान’ असलेले रजनीकांत सध्या त्यांच्या ‘कुली’ या चित्रपटामुळे प्रचंड

‘घरत गणपती’ २९ ऑगस्टपासून चित्रपटगृहात झळकणार

का ही कलाकृती या कायम पाहाव्या अशाच वाटतात. काही चित्रपटही असे असतात की जे पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. अशा