राजधानीत अभिजात मराठीचा अभुतपूर्व जागर

  34

नवी दिल्ली : यंदाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या शुक्रवारपासून नवी दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (तालकटोरा स्टेडिअम) मध्ये होत आहे. २१ते २३ फेब्रुवारीदरम्यान कवी संमेलन,मुलाखती,परिसंवाद,चर्चा असे वेगवेगळे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यंदाच्या साहित्य संमलेनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रंथदिंडीची सुरुवात देशाच्या संसदेतील छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहू महाराज,महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून होणार आहे. 'लोकशाहीच्या मंदिरातून साहित्याच्या मंदिराकडे' असा प्रवास ही ग्रंथदिंडी करणार आहे,अशी माहिती साहित्य संमेलन आयोजक असणाऱ्या सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी दिली. दिल्लीत त्यांनी यासंबंधी पत्रकार परिषद घेतली.



संजय नहार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन होत असून या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.२१ फेब्रुवारीला दुपारी ३.३० ला विज्ञान भवनात हा कार्यक्रम होईल. या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर,स्वागताध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल.राज्यातील साहित्यिकही या साहित्य सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता उद्घाटनाचे दुसरे सत्र संमेलनस्थळी होणार असून याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य मंत्री अशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल. मावळते संमेलनाध्यक्ष डॉ.रविंद्र शोभणे यांचे पूर्वाध्यक्ष भाषण होईल, तर संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण होईल.


तत्पूर्वी सकाळी ग्रंथ दिंडी काढण्यात येणार असून, ध्वजारोहण होईल. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे याच्या हस्ते ग्रंथदिंडीस प्रारंभ होणार असून नॅशनल बुक ट्रस्टचे चेअरमन मिलिंद मराठे,मावळते संमेलनाध्यक्ष डॉ.रविंद्र शोभणे, राज्याचे सांस्कृतिक सचिव विकास खारगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. ग्रंथदिंडीची सुरुवात संसदेतील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून होईल, या दिंडीत साहित्यिक, साहित्यप्रेमी, मराठी मंडळी सहभागी होणार आहेत. विविध कला पथकेही या दिंडीत सहभागी होतील, असेही संजय नहार म्हणाले. संमेलनाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रकाशकांचे स्टॉल असणार आहेत, तसेच याठिकाणी 'संत महापती' मंच असून तिथे इच्छूक साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन होईल. या साहित्य संमेलनास देशाबाहेरूनही साहित्यिक मंडळी येणार असल्याचे संजय नहार म्हणाले.

Comments
Add Comment

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

JeM Terrorist Killed: उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू, एक ठार

उधमपूर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील एका दुर्गम जंगली भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथ रथयात्रेची आजपासून सुरुवात, रथ ओढणाऱ्या दोऱ्यांची आहेत 'खास' नावे

पुरी : ओडिशामधील पुरी येथे दरवर्षी होणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेला आजपासून म्हणजेच शुक्रवार, २७ जूनपासून झालेली