मुंबई: ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सुरू होण्यास आता जास्त वेळ नाही आहे. स्पर्धेची सुरूवात बुधवारी १९ फेब्रुवारीपासून होत आहे. तर फायनलचा सामना ९मार्चला खेळवला जाणार आहे. यावेळेस या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान भूषवत आहे. स्पर्धेसाठी भारतीय संघाची नवी जर्सी लाँच करण्यात आली आहे.
भारतीय संघाच्या या जर्सीवर यजमान देश पाकिस्तानचे नावही आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराची येथे खेळवला जाणार आहे. तर भारतीय संघ आपला पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे.
रोहितसह ४ भारतीयांना मिळाला आयसीसीचा सन्मान
भारतीय संघाचा दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध २३ फेब्रुवारीला दुबईत रंगेल. भारतीय संघ ग्रुप स्टेजमध्ये आपला शेवटचा म्हणजेच तिसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. हा सामना २ मार्चला होईल. भारताचे सर्व सामने दुबईत होतील. रोहित शर्मा आणि पंड्याने आयसीसी टी-२० टीम ऑफ गी इयर कॅप मिळवली आहे. तर जडेजाला टेस्ट टीम ऑफ ईयर कॅप मिळाली आहे. यासाठी त्याची कॅप वेगळी आहे. वेगवान गोलंदाज अर्शदीपला टी-२० प्लेयर ऑफ द ईयर अवॉर्डसह टी-२० टीम ऑफ दी इयर कॅपही मिळाली आहे.