पनवेल : ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरावा, अज्ञानरूपी अंधार दूर व्हावा यासाठी झटणाऱ्या शाळामध्येच अंधार निर्माण होण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये वीज पुरवठा करण्यात जिल्हा परिषद अकार्यक्षम ठरली. जिल्हा परिषदेच्या ६३ शाळा अंधारात असल्याचा प्रकार समोर आला आहे. प्राथमिक शिक्षण विभागाकडून ही यादी घेण्यात आली आहे. शाळांना वीज पुरवठा व्हावा यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न होत नसल्याचे सांगितले जात आहे.
शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे डिजिटल शिक्षणाला हरताळ बसण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. शाळेत वीज पुरवठा करण्यासाठी शिक्षण विभागाकडून कार्यवाही करण्यात आली नसल्याचे दिसून आले आहे. गटशिक्षण अधिकारी यांना सूचना देऊन आपली जबाबदारी पूर्ण झाल्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या या गलथान कारभाराबाबत नाराजीचे सूर
उमटत आहेत.
रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे अडीच हजार शाळा आहेत. या शाळेमध्ये ९५ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले आहेत. डिजिटल शिक्षण देण्यासाठी शाळांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून प्रोजेक्टर उपलब्ध करण्यात आले. यातून आधुनिक पद्धतीने खेळता-खेळता शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ६३ शाळा गेल्या अनेक दिवसांपासून अंधारात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…