नंदुरबार : पुन्हा एकदा हिट अँड रनची चित्तथरारक घटना समोर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यात हिट अँड रन प्रकरणात आई आणि मुलासह त्यांच्या कुत्र्याचा गाडीखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर चालकाने पळ काढला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Sthal Trailer : ग्रामीण भागातील लग्नाची गोष्ट दिसणार; बहुचर्चित ‘स्थळ’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच!
नंदुरबार येथील शहादा शहरात हिट अँड रनमुळे आई आणि मुलाचा रस्त्यावर जागीच मृत्यू झाला आहे. फॉर्च्यूनर कारनं आई आणि मुलाला धडक देत चिरडले.
मिळालेल्या माहितीनुसार, वाढदिवस साजरा केल्यानंतर आई आणि मुलगा पायी रस्त्यावरून जात होते. रस्त्यावरून भरधाव वेगाने येणाऱ्या फॉर्च्यूनर गाडीने रस्त्यावर चालत असलेल्या आई आणि मुलाला धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत एक कुत्रा देखील होता. कुत्रा गाडीच्या चाकाखाली आल्यामुळे त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान या घटनेने नंदुरबार जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.