तुम्ही मातीच्या माठातलेच पाणी पिताय ना?

Share

माठांच्या निर्मितीत प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर

वाडा (वार्ताहर): उन्हाळ्याला सुरुवात होताच माठांची मागणी वाढते. काळानुसार कुंभाराने माठाचे स्वरूप बदलण्यास सुरुवात केली आहे. यात परप्रांतीय माठाने भर घातली आहे. काही माठांच्या निर्मितीत चक्क प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर होत आहे. असे माठ आरोग्याला घातक मानले जातात. बाहेर राज्यातून आलेल्या माठासाठी लाल माती आणि पीओपीचा वापर होत आहे. या माठावर आकर्षक रंगाची कलाकृती करण्यात आली आहे. हे माठ दिसायला सुंदर असतात. यामुळे ग्राहकही या माठाकडे आकर्षित होत आहेत.

माती अथवा परंपरागत काळा माठ आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. सध्या पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यासाठी साधे महाराष्ट्रीय माठ नागरिकांना ऑड वाटत आहेत. डिझाईन आणि नळाची तोटी असलेले माठ खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. हे माठ झिरपत नाही. अशा माठांच्या निर्मितीसाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर होतो. पीओपी च्या माठाचा शरीरावर दुष्परिणाम होतो. या माठातील पाणी झिरपत नाही. यामुळे आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होतोय. याशिवाय निसर्गावर ही त्याचा विपरीत परिणाम होतो. जो माठ अधिक पाझरतो त्या माठातील पाणी नैसर्गिकरीत्या थंड राहते. पाझरणाऱ्या माठातील पाणी आरोग्याला सुरक्षित व सर्वोत्तम मानले जाते.

आधुनिकीकरणाच्या नावाखाली जुने माठ आणि सुरळीचा नागरिकांना विसर पडला आहे. अशा माठाची विक्री कमी झाली आहे. त्यामुळे कुंभार समाज बांधवांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. भाजलेला मातीचा माठ ओळखताना तो वाजविल्यानंतर त्यातून विशिष्ट प्रकारचा आवाज येतो. अशा माठाला भाजलेला माठ असे समजता येते. या माठातून पाणी गाळून शुद्ध होते. पीओपी चा नवीन पद्धतीच्या माठाला बाजारात सर्वाधिक मागणी वाढत आहे. यामुळे परंपरागत माठ निर्मिती व खरेदीचा कल ही कमी झाला आहे. यातून कुंभाराचा पारंपारिक रोजगार बुडत आहे.

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

26 minutes ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

27 minutes ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

34 minutes ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

38 minutes ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

46 minutes ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

49 minutes ago