वाड्यातील कोंढले- खैरे रस्त्याची दुरवस्था

वाडा (वार्ताहर) : तालुक्यातील कोंढले-खैरे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे रस्त्यावर वाहन चालविणे कठीण होऊन बसले आहे. आपला जीव मुठीत घेऊन वाहनचालक येथून प्रवास करीत आहेत. शासनाने तातडीने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत. या रस्त्याची प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

वाडा तालुक्यातील कोंढले - खैरे रस्ता हा ९ कि. मी.अंतराचा असून मोठ्या वर्दळीचा आहे. कोंढले विभागातील १५ ते २० गावपाड्यांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याची सध्या चाळण झाली असून, गाव-पाड्यांतील नागरिकांना या खड्डेमय रस्त्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. कोंढले-खैरे हा रस्ता अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे. या रस्त्याची नव्याने दुरुस्ती होण्यासंदर्भात शासन स्तरावर अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आले आहेत. मात्र याबाबत कुठलीच दखल आजवर घेतली गेली नाही.
Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी