मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रीकडून गोड बातमी समोर आली आहे. ‘स्वराज्यजननी जिजामाता’, ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहचलेल्या अभिनेत्री अमृता पवारने एक आनंदाची बातमी प्रेक्षकांना दिली आहे. अमृताने २०२२ मध्ये नील पाटीलसोबत लग्न केलं आणि तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. अमृता आणि नील यांच्या लग्नाला दीड वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोघांच्या सुखी संसारात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. अमृताने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत या व्हिडिओमार्फत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.
DCM Ajit Pawar Update : उपमुख्यमंत्री अजित पवारांची तब्बेत बिघडली, आजचे सर्व कार्यक्रम रद्द!
अमृताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, सुरुवातीला एका एस्केलेटलरवरून दोन चपलांचे जोड खाली येताना दिसत आहेत. त्यानंतर अगदीच एक-दोन पायऱ्यांचं अंतर सोडून तिथे लहान मुलाची चप्पल दिसतेय. अखेरीस या तिन्ही चपला एस्केलेटलरच्या शेवटी येऊन पोहोचतात. त्यानंतर या व्हिडिओचा खरा अर्थ समजतो आहे. अमृताने हा व्हिडिओ शेअर करत “बेबी ऑन द वे…” असं कॅप्शन लिहिलं आहे. त्यामुळे तिचे चाहते सुद्धा प्रचंड खुश झाले आहेत. अमृताचं काल डोहाळे जेवण देखील पार पडलं असून त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
दरम्यान अमृताने शेअर केलेल्या व्हिडिओ नंतर तिचे मित्रमैत्रिणी, सहकलाकार तसेच तिचे चाहते तिला पुढील वाटचालीसाठी भरभरभरून शुभेच्छा देत आहेत.