सिंधुदुर्ग : बिग बॉस फेम कोकण हार्टेर्ड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर काल ( दि १६ ) लग्नबंधनात अडकली आहे. मराठी सिनेविश्वातील संगीतकार कुणाल भगत सोबत अंकिताची लग्नगाठ बांधली गेली आहे. अंकिताच्या लग्नाला सिनेविश्वातील कलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सने हजेरी लावली होती.
अंकिता आणि कुणालच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या जोडप्याला मनोरंजन विश्वातील कलाकारांसोबत नेते मंडळींनी देखील आशीर्वाद दिले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावलमध्ये असणाऱ्या ‘लक्ष्मीनारायण मंदिरा’त या दोघांची लग्नगाठ बांधली गेली आहे. या शाही सोहळ्याला विद्यमान आमदार व कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी उपस्थिती लावत या दोघांनाही पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मंत्री नितेश राणे यांनी या नवदाम्पत्यासोबत फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.
‘सिंधुदुर्गाची सुकन्या ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिच्या लग्न सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्यास पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.’ अशी मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहली आहे. दरम्यान अंकिताच्या आणि कुणालच्या शाही लग्नसोहळ्याची सर्वत्र सुरु आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…