ठाणे जिल्हापरिषदेच्या शिक्षक पदोन्नतीमध्ये दिव्यांगांवर अन्याय

शहापूर (वार्ताहर) : दिव्यांग शिक्षकांना डावलून इतर शिक्षकांची पदोन्नती करण्याचा धक्कादायक प्रकार ठाणे जिल्हापरिषदेत झाल्याचे समोर आले आहे. दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रथम पदोन्नती देण्याबाबत उच्च न्यायालयाचे तसेच शासनाचे आदेश असताना ठाणे जिल्हा परिषदेने धिसाढघाई करीत इतर कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन दिव्यांगांना डावलल्याने त्यांच्यामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. दिव्यांगांना डावलून इतर कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आल्याने यामागे नेमके काय गौडबंगाल आहे या चर्चेला उधाण आले असून जिल्हापरिषदेच्या या पदोन्नती प्रक्रियेने संतप्त झालेले दिव्यांग कर्मचारी न्यायालयात धाव घेऊन दाद मागणार आहेत.

दोन दिवसांपूर्वी ठाणे जिल्हापरिषदेच्या शिक्षण विभागातील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती करण्यात आल्या. ठाणे जिल्हा परिषदेतील पदोन्नती करताना प्रथम दिव्यांग कर्मचाऱ्यांची पदोन्नती करावी व नंतर इतर कर्मचाऱ्यांची पदोन्नती करावी असे उच्च न्यायालय व शासनाचे आदेश आहेत. असे असताना दिव्यांग पदे राखीव ठेवून इतर कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असल्याचा थेट आरोप महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेने केला आहे. पदोन्नती बाबत दिव्यांग संघटनेने ३१ डिसेंबर २०२४ ला लक्ष वेधल्यानंतर ठाणे जिल्हापरिषदेने दिव्यांगांसाठी आरक्षित पदांवर सेवाजेष्ठतेनुसार पात्र दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी दिव्यांग पदांची सुनिश्चिती होण्याबाबत ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे विनंती केली होती. मात्र याबाबत प्रधान सचिवांच्या उत्तराची वाट न पाहता ठाणे जिल्हापरिषदेने दिव्यांगांना डावलून धीसाडघाई करीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागातील ५२ शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली. दिव्यांगांना डावलल्याने या पदोन्नतीमुळे दिव्यांगांवर अन्याय झाला असून तीव्र असंतोष पसरला आहे. याबाबत चौकशी व्हावी अशी मागणीही केली जात आहे.

या प्रक्रियेत सुदृढ कर्मचाऱ्यांना जवळच्या शाळांवर नियुक्ती होइल व दिव्यांग कर्मचाऱ्यांची पदे राखीव ठेवून त्यांची दूरच्या शाळांवर नियुक्ती होईल किंवा यानंतर ही प्रक्रिया काही कारणास्तव लांबणीवर गेल्यास दिव्यांग कर्मचारी सेवानिवृत्त होतील मात्र त्यांना पदोन्नती मिळणार नाही हा अन्याय आहे. त्यामुळे पदोन्नती प्रक्रिया रद्द करून दिव्यांगांना न्याय मिळण्यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचे ठाणे जिल्हा दिव्यांग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश राऊत व सचिव नितीन पाटोळे
यांनी सांगितले.
Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा