प्रत्येकाला गंगा मातेचा आशीर्वाद मिळेल - गडकरी

प्रयागराज : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्नी आणि कुटुंबासह महाकुंभ संगमात स्नान करून पूजा केली. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, गंगा स्नान आणि दर्शन पूजा खूप छान झाली. आपल्या नागपूर शहरातून हजारो लोक आपली वाहने घेऊन येथे येत आहेत. आम्हाला वाटते की प्रत्येकाला गंगा मातेचा आशीर्वाद मिळेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. सोशल मीडियावर पवित्र स्थानाचे फोटो पोस्ट केले आहेत. आज प्रयागराज महाकुंभात, मला पवित्र संगमात स्नान आणि पूजा करण्याचे सौभाग्य मिळाले! शुद्ध, निर्मळ माता गंगेचा आशीर्वाद मिळाला, असं म्हटलं.

महाकुंभाचा आज ३५ वा दिवस होता. आत्तापर्यंत ५१ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र संगमात स्नान केले आहे. महाकुंभाला अजून १० दिवस बाकी आहेत. त्यामुळे इथं स्थान करणाऱ्यांची संख्या ५५ कोटींच्या जवळपास पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्याआधी गडकरी कुटुंबासह प्रयागराजला पोहोचले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. यावेळी गृह सचिव संजय प्रसाद हेही उपस्थित होते. महाकुंभ स्नानासाठी गडकरी आल्याने भाविकांमध्ये उत्साह दिसून आला.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव