छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची उपमुख्यमंत्री पवारांकडे मागणी

नाशिक : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा उलगडणारा ‘छावा’ चित्रपट टॅक्स फ्री करा अशी मागणी ‘सुविचार मंच’चे संयोजक आकाश पगार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. नाशिक दौऱ्यावर आलेले राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांची आकाश पगार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेऊन वरील मागणीचे निवेदन दिले. अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी बोलतांना दिले.


स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा उलगडणार आणि जीवनचरित्रावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट शुक्रवारी १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि सिनेचाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.चित्रपट पाहिल्यानंतर सिनेमागृहाबाहेर येणारे प्रेक्षक डोळ्यातून अश्रू ढाळत असल्याचेही दिसून आले. अंगावर शहारे आणणारे प्रसंग आणि तितकेच दमदार डायलॉग हे शिवभक्तांचे रक्त सळसळ करणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत. महाराष्ट्र भूमीत जन्मलेला या दोन्ही महाराजांनी अखंड हिंदुस्थानचा इतिहास रचला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपट सर्वसामान्य जनतेला मोठ्या पडद्यावर अनुभवता यावा यासाठी हा चित्रपट टॅक्स मुक्त करावा अशी मागणी आकाश पगार यांनी केली आहे.


यापुर्वी देखील महाराष्ट्रात अनेकदा इतिहास तसेच महापुरुषांच्या जीवनसंघर्षावर आधारित चित्रपट टॅक्स फ्री केलेले आहेत. यापूर्वी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी - द अनसंग वॉरिअर’’ चित्रपट, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील ‘सत्यशोधक’ चित्रपट, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या जीवनावर आधारित ‘सचिन - अ बिलियन ड्रिम्स’ हा चित्रपट, एअर हॉस्टेस नीरजा यांच्या धाडसाची कहाणी असलेला ‘नीरजा’ हा चित्रपट, महिला बॉक्सर मेरी कोम यांच्या जीवनावरील ‘मेरी कोम’ चित्रपट, दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा ‘हिंदी मिडीयम’ आदी चित्रपटांना महाराष्ट्रात टॅक्स फ्रि करण्यात आल्याकडे देखील यावेळी लक्ष वेधण्यात आले.


स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनसंघर्षावर आधारित असणारा "छावा" चित्रपट टॅक्स फ्री करावा, अशी मागणी उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

Dashavtar Box Office Collection: दशावतारच्या कमाईत होतेय जबरदस्त वाढ, कमावले तब्बल इतके कोटी...

मुंबई: बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य सिनेमांपर्यंत सर्वांवर सध्या मराठी सिनेमा दशावतार भारी पडत आहे. दिवसेंदिवस

अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर

मुंबई: अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये