Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडी

महाकुंभातील पवित्र स्नानासाठी केली शेकडो किलोमीटरची सायकल यात्रा

महाकुंभातील पवित्र स्नानासाठी केली शेकडो किलोमीटरची सायकल यात्रा
प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर महाकुंभमेळा सुरू आहे. या १३ जानेवारीपासून सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात शनिवार १५ फेब्रुवारीपर्यंत ५१.४७ कोटींहून अधिक लोकांनी पवित्र स्नान केले, या संदर्भातील माहिती उत्तर प्रदेश सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने दिली आहे. याच महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी वडील आणि मुलगी शेकडो किलोमीटरची सायकल यात्रा करुन आले. संगमावर पवित्र स्नान केल्यानंतर त्यांना सायकल यात्रेचे सार्थक झाल्यासारखे वाटले.



सायकलवरुन आलेले वडील आणि मुलगी दिल्लीच्या ज्या भागात वास्तव्यास आहेत तिथून प्रयागराज पर्यंतचे अंतर ६७५ किमी. आहे. हा प्रवास वडील आणि मुलगी यांनी सायकलवरुन केला. रेल्वे आणि बसला असलेली गर्दी तसेच ठिकठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडीत अडकण्याचा धोका ओळखून दोघांनी सायकलवरुन संगमावर पोहोचण्याचा निर्णय घेतला. अनुपमा पंत आणि तिचे वडील उमेश पंत यांनी सायकल प्रवास नकळत नव्या विक्रमाची नोंद केली.



सायकलचा प्रवास आरोग्यासाठी उत्तम आहे. शिवाय वाहतूक कोंडीच्या समस्येवर एक प्रभावी उपाय आहे, असे अनुपमा आणि तिचे वडील उमेश यांनी सांगितले. सायकल यात्रेमुळे नियोजन करुन प्रयागराजला पोहोचणे शक्य झाले असेही ते म्हणाले. दोघांनी नागरिकांना सायकलद्वारे जास्तीत जास्त प्रवास करण्याचे आवाहन केले.
Comments
Add Comment