UAE ला जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी 'व्हिसा ऑन अरायव्हल' सुरू

अबुधाबी : संयुक्त अरब अमीरात अर्थात यूएईला जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी 'व्हिसा ऑन अरायव्हल' हा पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळे पासपोर्ट धारक भारतीय विमानाचे तिकीट खरेदी करुन थेट यूएईला जाऊ शकतील. त्यांना विमानतळावरील कार्यालयात विशिष्ट कागदपत्र सादर करताच लगेच मर्यादीत काळासाठीचा व्हिसा दिला जाईल. यामुळे यूएईला जाणे भारतीयांसाठी सोपे झाले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू होण्याआधीच यूएईने भारतीयांसाठी 'व्हिसा ऑन अरायव्हल' सुरू केले आहे. यामुळे क्रिकेटप्रेमी भारतीयांना दुबईत भारताचे सामने बघण्यासाठी जाणे सोपे झाले आहे.



अर्थचक्राला चालना देणे, रोजगार निर्मिती करणे आणि पर्यटनाला चालना देणे यासाठी यूएईने 'व्हिसा ऑन अरायव्हल' भारतीयांना उपलब्ध करुन दिला आहे. सध्या 'व्हिसा ऑन अरायव्हल' हा चार, चौदा आणि साठ दिवसांच्या पर्यायात उपलब्ध आहे.

'या' भारतीयांना यूएईमध्ये 'व्हिसा ऑन अरायव्हल' घेता येणार

  1. अर्ज करण्याच्या किमान सहा महिने आधीपासून संबंधित व्यक्तीकडे भारत सरकारने दिलेला वैध पासपोर्ट असेल

  2. अर्ज करणाऱ्या भारतीयाकडे अमेरिका, युरोपियन यूनियन, युनायटेड किंगडम अर्थात इंग्लंड, सिंगापूर, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा यापैकी किमान एकाचा वैध व्हिसा वा निवासी परमिट वा ग्रीन कार्ड असेल

  3. नियमानुसार योग्य कागदपत्रांसह आवश्यक ती माहिती देणारा विहित नमुन्यातील अर्ज सादर केला असेल

  4. अर्जासोबत व्हिसा फी जमा केली असेल

Comments
Add Comment

सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’चे कामकाज ठप्प !

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेचे कामकाज सध्या ठप्प झाले

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले!

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानचे वागणे

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा

स्टॉकहोम : वैद्यकशास्त्रातील (मेडिसिन) २०२५ चा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या मेरी ई. ब्रंकॉ आणि फ्रेड रैम्सडेल तसेच

गाझातील सत्ता न सोडल्यास हमासची धुळधाण करू

डोनाल्ट ट्रम्प यांची ताकीद वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या

इस्त्रायलचा गाझावर हल्ला, ६ ठार

गाझा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टीत शांतता नांदावी म्हणून गाझा पीस प्लॅनची घोषणा