Sunday, May 11, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

हिंदू समाजाला एकत्र करणे हेच संघाचे उद्दिष्ट : मोहन भागवत

हिंदू समाजाला एकत्र करणे हेच संघाचे उद्दिष्ट : मोहन भागवत
कोलकाता (वृत्तसंस्था): देशासाठी जबाबदार असलेला समाज हा हिंदू आहे.त्यामुळेच संघाचे उद्दिष्ट फक्त हिंदू समाजाला एकत्र करणे आहे, असे ठाम मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले.



राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पश्चिम बंगालमध्ये १० दिवसांचा दौरा केला. त्याच दौऱ्याची रविवारी जाहीर सभेने सांगता झाली आहे. या सभेला संबोधित भागवत पुढे म्हणाले की,देशभरात १ लाख ३० हजारांहून अधिक स्वयंसेवक आहेत. तो कोणाकडूनही पैसे घेत नाही, तो स्वतः काम करतो. म्हणूनच आम्ही म्हणतोय की, आम्ही हे प्रसिद्ध होण्यासाठी करत नाही आहोत, तर भारताच्या प्रगतीत अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी आम्ही हे करत आहोत.
पुढे ते म्हणाले,”भारताला एक निसर्ग आहे आणि ज्यांना वाटले की ते त्या निसर्गासोबत राहू शकत नाहीत. त्यांनी स्वतःचा वेगळा देश निर्माण केला. हिंदू जगाच्या विविधतेचा स्वीकार करून पुढे जातात.आजकाल आपण विविधतेत एकता म्हणतो, हिंदूंचा असा विश्वास आहे की एकतेत विविधता आहे."



रामायणातील दाखले देत संघप्रमुख म्हणाले की,”इथे राजे आणि सम्राटांची आठवण कोणालाच नाही पण तो राजा आठवतो ज्याने आपल्या वडिलांसाठी १४ वर्षे वनवासात घालवला आणि ज्याने आपल्या भावाचे चप्पल ठेवले आणि परतल्यावर आपल्या भावाला राज्य दिले.



मोहन भागवत यांनी पश्चिम बंगालच्या दहा दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी संघाच्या अनेक नेत्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. यामध्ये त्यांनी संघाचे संघटन बळकट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय, मोहन भागवत यांनी आरजी कार मेडिकल कॉलेज बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या पालकांचीही भेट घेतली. दरम्यान भागवत यांचा हा पश्चिम बंगाल दौरा म्हत्त्वाचा मानला जात आहे, कारण येत्या काळात पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर शेजारील देश बांगलादेशशी संबंध बिघडलेले आहेत.त्यामुळे बंगालच्या सीमावर्ती भागात तणाव आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.
Comments
Add Comment