नवी दिल्ली : लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांची ब्रिटिश पत्नी एलिझाबेथ कोलबर्न गोगोई यांचे पाकिस्तानच्या ISI शी कनेक्शन असल्याच्या आरोपांची विशेष तपास पथक (Special Investigation Team or SIT) स्थापन करुन चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. लग्नानंतर एलिझाबेथ कोलबर्न गोगोई या पाकिस्तानचे नागरिक असलेल्या किती लोकांच्या संपर्कात आहेत आणि ही मंडळी नेमकी कोणत्या स्वरुपाची कामं करतात ? यामुळे भारताच्या तसेच देशाच्या ईशान्य भागातील राज्यांच्या प्रामुख्याने आसामच्या सुरक्षेला किती धोका आहे याचाही तपास होण्याची शक्यता आहे.
असम के एक सांसद से जुड़े कुछ गंभीर तथ्य उजागर हुए हैं।
राष्ट्र की सुरक्षा से संबंधित किसी भी प्रकार का समझौता नहीं किया जाना चाहिए। pic.twitter.com/IjitEzv41L
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) February 14, 2025
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक्स पोस्ट (ट्वीट) केली आहे. यात त्यांनी एलिझाबेथ कोलबर्न गोगोई लग्नानंतर पाकिस्तानमध्ये जाऊन आल्याची माहिती हाती आल्याचे सांगितले. या संदर्भात आणखी माहिती लवकरच हाती येईल, असे सूतोवाच आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहे. यामुळे एलिझाबेथ कोलबर्न गोगोई यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गौरव गोगोई यांचे वडील तरुण गोगोई हे आसामचे मुख्यमंत्री होते. तरुण गोगोई हे मुख्यमंत्री असतानाच्या काळात पाकिस्तानच्या ISI चे हात थेट मुख्यमंत्र्यांच्या टेबलपर्यंत पोहोचले होते का याचाही तपास होण्याची शक्यता आहे.
कोण आहेत एलिझाबेथ कोलबर्न गोगोई ?
काँग्रेसच्या गौरव गोगोई आणि एलिझाबेथ कोलबर्न यांची भेट संयुक्त राष्ट्र सचिवालयात २०१० मध्ये झाली. पुढे २०१३ मध्ये गौरव गोगोई आणि एलिझाबेथ कोलबर्न यांनी प्रेमविवाह केला. आधी या लग्नाला गौरव गोगोई यांचे वडील आणि आसामचे त्यावेळचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांची संमती नव्हती. पण नंतर तरुण गोगोई यांनी गौरव गोगोई आणि एलिझाबेथ कोलबर्न यांच्या लग्नाला संमती दिली. हाती आलेल्या माहितीनुसार, एलिझाबेथ कोलबर्न लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकल्या आहेत. त्यांनी प्रामुख्याने स्वयंसेवी संस्थांमध्ये काम केले. सध्या एलिझाबेथ कोलबर्न गोगोई या ऑक्सफर्ड पॉलिसी मॅनेजमेंट या संस्थेसाठी काम करतात. पर्यावरणाच्या क्षेत्रात ही संस्था कार्यरत आहे. याआधी एलिझाबेथ कोलबर्न या सीडीकेएन नावाच्या पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेत कार्यरत होत्या. याच संस्थेच्या माध्यमातून पाकिस्तानचे ISI त्यांच्या पहिल्यांदा संपर्कात आल्याचे वृत्त आहे.
लग्न झाले आणि मागील १२ वर्षांपासून एलिझाबेथ कोलबर्न भारतात आहेत. पण त्यांनी अद्याप भारताचे नागरिकत्व स्वीकारलेले नाही. आजही त्या ब्रिटिश नागरिक आहेत. भारतात व्हिसा आहे म्हणून वास्तव्य करत आहेत; असे आरोप त्यांच्यावर होत आहेत. पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करण्याच्या नावाखाली एलिझाबेथ कोलबर्न पाकिस्तानकरिता काम करतात भारतात देशविरोधी कामं करतात, असाही आरोप त्यांच्यावर होत आहे.