
मुंबई : जगभरात १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन डे (Valentines Day) वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. काही जण फुलं, भेटवस्तू देऊन आपली भावना व्यक्त करतात, तर काही जण खास डेट प्लॅन करून हा दिवस संस्मरणीय करतात. दरम्यान, 'तारे जमीन पर' फेम अभिनेता दर्शिल सफारी (Darsheel Safary) याने आगळावेगळा व्हॅलेंटाईन डे साजरा केला आहे.

डोंबिवली : डोंबिवलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसूतीनंतर अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेचा मृतदेह तब्ब्ल ४० ...
अभिनेता अजिंक्य देव यांनी ‘अकॅडमी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट’ ही संस्था सुरु केली असून या संस्थेतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून यंदाच्या 'व्हॅलेंटाइन्स डे' ला 'बेक सेल बोनान्झा' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये संस्थेमधील विशेष विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेली बेकरी उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. या खास उपक्रमाला अभिनेता दर्शिल सफारीने हजेरी लावली असून या मुलांच्या हातची कला थक्क करणारी असल्याची प्रतिक्रिया दर्शिल सफारीने यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, या उपक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक व पाहुण्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून या मुलांच्या कौशल्याला योग्य तो वाव मिळावा यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. 'बेक सेल बोनान्झा' ला मिळालेला प्रतिसाद आम्हाला सुखावणारा आहे, असे अजिंक्य देव यांनी सांगितले.