Friday, March 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजLove Jihad : लव्ह जिहाद रोखण्यासाठी राज्यात धर्मांतर विरोधी कायद्यासंदर्भात विशेष समिती...

Love Jihad : लव्ह जिहाद रोखण्यासाठी राज्यात धर्मांतर विरोधी कायद्यासंदर्भात विशेष समिती गठीत

मंत्री नितेश राणे यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात आंतरधर्मीय विवाहाच्या माध्यमातून उघडकीस येणाऱ्या लव्ह जिहादच्या (Love Jihad) घटनांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार कठोर पावले उचलताना दिसत असून, पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीचे गठन करण्यात आले आहे.

ही समिती इतर राज्यांनी लव्ह जिहाद विरोधी तसेच सक्तीच्या अथवा फसवणूक करून केलेल्या धर्मांतर विरोधात केलेल्या कायद्याचा अभ्यास करून, राज्यातील कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सरकारला शिफारस करणार आहे. याबाबत मत्स्य उद्योग व बंदरे मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

लव्ह जिहाद ही एक मोठी समस्या असून, अशा प्रकारच्या तक्रारी रोखण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून काम केले जात आहे. आता या समितीच्या माध्यमातून लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करण्यासाठी काम केले जाईल, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -