

CIDCO Lottery : सिडकोच्या घरांसाठी आज सोडत
नवी मुंबई : सिडकोच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत शनिवारी (दि. १५) तळोजा फेज एक सेक्टर २८ मधील रायगड इस्टेट येथे सकाळी ११ ...
सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभाग आणि अतिरिक्त पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग, नवी मुंबई, विठ्ठल कुबडे यांनी मोटार वाहन कायदा कलम ११५ आणि ११६ (१) (अ) (ब) अंतर्गत वाहतूक निर्बंध लागू करणारा आदेश काढला आहे. निर्बंधांनुसार, मॅरेथॉनसाठी आवश्यक असलेल्या वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांना अटल सेतूवर प्रवेशबंदी असेल. प्रामुख्याने मुंबई, पुणे, उरण आणि जेएनपीटी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. उरणहून येणारे गव्हाण फाटा, उरण फाटा आणि वाशी मार्गे प्रवास करू शकतील. पुणे-मुंबई वाहतुकीसाठी यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे बेलापूर आणि वाशी मार्गे उपलब्ध असेल. कोकण आणि पनवेलहून येणारी वाहने देखील उरण फाटा आणि वाशी मार्गे प्रवास करू शकतील, असे वाहतूक विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

Mahakumbhmela : पश्चिम रेल्वेकडून महाकुंभमेळ्यास २ विशेष गाड्या चालवणार
मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी आणि महाकुंभ मेळा २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी सामावून घेण्यासाठी, पश्चिम रेल्वेने वलसाड-दानापूर आणि ...
पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन सेवा तसेच मॅरेथॉनमध्ये थेट सहभागी असलेल्या वाहनांना अटल सेतूवरील निर्बंधांतून सवलत देण्यात आली आहे. नागरिकांनी सूचनांचे पालन करावे आणि गैरसोय टाळावी; असेही आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.